कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुसक्या आवळल्या असून पुणे पोलिसांनी त्याला वाईमधून अटक केली आहे. त्याचेवर २० कोटींची खंडणी आणि अपहरणाप्रकरणी गुन्हा दाखल होता. पुणे पोलिस गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी ही कारवाई केली आहे. मारणे टोळीने परिसरात वर्चस्व निर्माण करण्यासाठी वेगवेगळे गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याशिवाय काही दिवसांपूर्वी त्याच्या सांगण्यावरून या टोळीने एका व्यावसायिकाचे अपहरण करून २० कोटींची खंडणी मागितली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेने आरोपीना अटक केली आहे.
व्यावसायिकाचे अपहरण करून खंडणी मागितल्याच्या प्रकरणात गजा मारणे हा फरार होता. या प्रकरणी त्याच्या टोळीवर पुणे पोलिसांनी नुकतीच मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. गुन्हे शाखेची पथके त्याच्या मागावर होती. अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे हे सर्व वरिष्ठ अधिकारी गजा मारणे याच्यावर पाळत ठेवून होते.
व्यवसायिकाचे मोटारीतून अपहरण करून २० कोटींची खंडणी मागणाऱ्या गुंड गजा उर्फ महाराज मारणे टोळी विरुद्ध मोक्कानुसार नुकतेच कारवाई करण्यात आली आहे. गजानन ऊर्फ गजा ऊर्फ महाराज पंढरीनाथ मारणे – टोळी प्रमुख ) (रा. हमराज चौक शास्त्रीनगर कोथरुड पुणे), सचिन ऊर्फ पप्पु दत्तात्रय घोलप (वय ४३ रा धनकवडी), हेमंत ऊर्फ आण्णा बालाजी पाटील (वय ३९ रा. बुरली ता. पलुस जि. सांगली), अमर शिवाजी किर्यत (वय ४६ रा. कोडोवली ता. जि. सातारा), फिरोज महम्मद शेख (वय ५० रा. समर्थनगर कोडोवली ता. जि. सातारा), रुपेश कृष्णारावमारणे, (रा. नव एकता कॉलनी शास्त्रीनगर कोथरुड), संतोष शेलार (रा. कोथरुड), मोनिका अशोक पावर (रा. दापोडी), अजय गोळे (रा. नर्हे), मथुर जगदाळे (रा. आंबेगाव पठार), मानसिंग ऊर्फ सुमत मोरे (रा. सातारा), नितीन पौगारे (रा. सातारा), प्रसाद खडागळे (रा. तळजाई पठार सहकारनगर) या जणांवर मोक्कानुसार कारवाई करण्यात आली आहे.