(संगलट / इक्बाल जमादार)
चिपळूण कराड विजापुर रस्ता यामध्ये कुंभार्ली घाटाचा समावेश आहे. पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा प्रमुख मार्ग असल्याने रोज हजारो वाहनांची ये जा होत असते. आपल्या विभागामार्फत दरवर्षी पावसाळयानंतर लाखो रुपायांची रस्त्यासाठी डागडूजी करण्यात येते. परंतु दरवर्षी सदरचा रस्ता पुन्हा नादुरुस्त होतो.
चिपळूण तालुक्याचे आमदार शेखर निकम यांच्या माध्यमातुन दरवर्षी सदर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी आणला जातो. मात्र काम निकृष्ट होत आहे. मागील वर्षी रस्त्याला पडलेला निधी आणि रस्त्याची दुरावस्था यामध्ये शासनाचा लाखोचा निधी हा वाया गेलेला आहे. सदरच्या रस्त्याची इतकी दुरावस्था आहे की कायमस्वरुपी छोटे मोठे अपघात होत आहेतच. तसेच भविष्यात मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि होणा-या अपघातास जबाबदार कोणाची ? कामाबददल निवेदन घेतली जात आहेत, मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही.
सदर रस्त्याची चांगल्या प्रकारची डागडूजी लवकरात लवकर करण्यात यावी अन्यथा चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतिने आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष अबू ठसाळे, शहराध्यक्ष मिलिंद कापडी, उदय ओतारी,खालिद दाभोलकर, मनोज जाधव, बाबू साळवी, सचिन साडविलकर, खालिद पटाईत, विशाल जानवलकर, अनिकेत ओतारी, राहुल शिंदे, संजय कदम आदी उपस्थित होते.