(राजापूर/प्रतिनिधी)
राजापूर तालुक्यातील कुंभवडे ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या झालेल्या ग्रामसभेत सामाजिक व शैक्षणिक कार्याची आवड असणारे श्री.शैलेंद्र बापू प्रभुदेसाई यांची गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी श्री.प्रभुदेसाई यांनी तंटामुक्ती अध्यक्ष पदाची जबाबदारी मी नि:पक्षपाती पार पाडेन व ग्रामस्थांच्या सहकार्याने गाव शंभर टक्के तंटामुक्त करण्याचा मनोदय व्यक्त केला.
यावेळी उपस्थित सरपंच सौ.मनाली आग्रे, उपसरपंच श्री.पंढरीनाथ मयेकर, पोलीस पाटील श्री.गजानन प्रभुदेसाई, तलाठी श्री.लक्ष्मण नरके, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष श्री.संतोष बाणे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ यांनी श्री. प्रभुदेसाई यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.