( जीवन साधना )
कुंडलीत स्थित असलेल्या नऊ ग्रहांच्या प्रभावानुसार व्यक्तीला सुख किंवा दुःख प्राप्त होते. सर्व राशींवर नऊ ग्रहांमधील शनीच्या स्थितीचा विशेष प्रभाव राहतो. शनि अशुभ स्थितीमध्ये असल्यास वेगवेगळ्या कामांमध्ये अशुभ फळ प्राप्त होतात. येथे जाणून घ्या, असे 15 संकेत जे सांगतात की व्यक्तीच्या कुंडलीत शनि अशुभ स्थितीमध्ये आहे.
1- शनि अशुभ असल्यास डोळे कमजोर होतात, कंबरदुखी सुरु होते.
2- एखाद्या विद्यार्थ्यासाठी शनि अशुभ असेल, तर त्याचे अभ्यासात लक्ष लागत नाही.
3- जर तुम्ही घराचे बांधकाम करत असाल आणि एखादी अशुभ घटना घडली तर समजून घ्यावे शनि प्रतिकूल आहे.
4- जेव्हा तुमचे मन वाईट गोष्टींकडे, कुसंगती, व्यसनाकडे झुकेल, धन आणि शरीराचा नाश होऊ लागला तर हे शनीचे अशुभ फळ आहेत असे समजावे.
5- शरीरात नेहमी आळस राहील, कोणतेही काम करण्याची इच्छा राहणार नाही. व्यक्तीच्या चेहऱ्यावर थकवा, तणाव जाणवतो. तरुणपणातच वृद्धावस्थेची जाणीव होईल.
6- चप्पल-बूट वारंवार तुटणे-फाटणे, हरवणे या गोष्टी शनीच्या अशुभ प्रभावामुळे घडत असतात.
7- व्यवसायात तुमचा पार्टनर धोका देऊ शकतो.
8- तुमचे केस जास्त गळू लागतील किंवा केसांशी संबंधित एखादा आजार होऊ शकतो.
9- शनि गरीब वर्गाचा प्रतिनिधी आहे आणि जर एखाद्या गरीब व्यक्तीमुळे तुम्हाला नुकसान होऊ लागले किंवा त्याच्यासोबत वाद होऊ लागले तर हा अशुभ शनीचा संकेत समजावा.
10- तुम्हाला नको असलेल्या ठिकाणी तुमची बदली होऊ शकते किंवा नोकरी जाऊ शकते.
11- घरामध्ये कलह निर्माण होतात तसेच मित्र, नातेवाईकांसोबत वाद होऊ शकतात.
12- कामाच्या ठिकाणी चोरीचा आरीप लागणे, तुमच्या विरुद्ध चौकशीचे आदेश, एखादी शिक्षा भोगावी लागू शकते.
13- दिवसेंदिवस कर्ज घेण्याची वेळ येते.
14- वारंवार आजारी पडणे. एखाद्या अपघातात मोठी दुखापत होणे.
15- जेव्हा तुमच्या जीवनात अशा घटना घडू लागतात तेव्हा समजून घ्यावे की, शनीची तुमच्यावर वक्र दृष्टी आहे.
@ यशवंत नाईक