देशातील शेतकर्यांना मदत केंद्र सरकाराकडून ‘पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना’ राबवली जाते. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकरी कुटुंबाला दरवर्षी 6000 रुपये मिळतात. ही रक्कम लाभार्थ्यांना 2000 रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते. याच पार्श्वभूमीवर उद्या सकाळी 11 वाजता पंतप्रधान मोदी हे 2000 रुपयांचा आठवा हप्ता जाहीर करणार आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे शेतकर्यांशी संवाद साधतील. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
9.5 कोटी शेतकरी कुटुंबांना 19 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये मिळणार
या योजनेंतर्गत उद्या 9.5 कोटी लाभार्थी शेतकर्यांच्या खात्यात 19 हजार कोटींपेक्षा जास्त रुपये ट्रान्सफर करण्यात येणार आहे. या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत पंतप्रधानसह कृषी मंत्री नरेंद्र तोमरदेखील सामील असणार आहे. पीएम किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये अंतरिम बजेटमध्ये जाहीर करण्यात आली असून डिसेंबर 2018 पासून अंमलात आली होती.
सूचीमध्ये आपले नाव असे चेक करा
- सर्व प्रथम पंतप्रधान किसानच्या अधिकृत वेबसाइटला https://pmkisan.gov.in भेट द्या.
- वेबसाइट उघडल्यानंतर मेनूबारमधील फार्मर कॉर्नरवर क्लिक करा.
- येथील लाभार्थी यादीवर क्लिक करा.
- यानंतर आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा, गट आणि गावची माहिती प्रविष्ट करा.
- यानंतर आपल्याला Get Report क्लिक करावे लागेल. या अहवालात आपल्या गावातील सर्व लाभार्थ्यांची माहिती मिळेल.
- या यादीमध्ये आपण आपले नाव तपासू शकता.
यादीमध्ये आपले नाव नसल्यास अशी तक्रार नोंदवा
जर आपण नोंदणी केली असेल आणि आपले नाव लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नसेल तर आपण पीएम किसान या वेबसाइटवरील हेल्पलाइन नंबरवर आपली तक्रार नोंदवू शकता.
- पीएम किसान हेल्पलाईन – 155261
- पंतप्रधान किसान टोल फ्री – 1800115526
- पंतप्रधान किसान लँडलाईन क्रमांक – 011-23381092, 23382401
- ईमेल आयडी pmkisan-ict@gov.in वर ईमेलद्वारे तक्रार देखील केली जाऊ शकते.
रजिस्ट्रेशन करताना या गोष्टींवर लक्ष द्या
नोंदणी करताना आपले नाव, पत्ता, बँक खाते याची माहिती व्यवस्थित भरुन चेक करा. जर यातील कोणतीही माहिती चुकीची असेल तर आपल्याला 2000 रुपयाचा हप्ता मिळणार नाही. नोंदणी करताना जर एखादी माहिती चुकीची भरली गेली असेल तर त्यामध्ये बदल करता येतो.