(रत्नागिरी)
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत लाभार्थ्यांना वर्षाला सहा हजार रुपये लाभ दिला जातो. आता योजनेचा १४ वा लाभाचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे बंधनकारक आहे.
ई-केवायसी मोहीम १ मे ते १५ मे २०२३ या कालावधीत राबवण्यात आली होती. ज्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी केलेले नाही अशा लाभार्थ्यांनी ई केवायसी प्रक्रिया तात्काळ करावी. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरमधून PM KISAN GOI हे FACE recognition ॲप डाउनलोड करून त्याद्वारे ई-केवायसी करावी. शेतकऱ्यांनी ई-केवायसीच्या अडचणीबाबत किंवा अधिक माहितीसाठी क्षेत्रीय पातळीवर कृ सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृ अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.