(राजापूर / वार्ताहर)
किशोरअवस्था हा झपाट्याने होणाऱ्या बदलांचा काळ असतो. स्वतःमध्ये होणाऱ्या शारिरीक, मानसिक, बौद्धिक, लैंगिक व सामाजिक बदल घडत असल्यामुळे गांगारूण जाऊ नका. किशोर अवस्था हा स्वतःला घडवण्याचा, स्वतःची ओळख निर्माण करण्याचा काळ असतो, वय असते, तसा प्रयत्न करा. मग बाकी समस्यावर आपण नक्कीच मात करू शकतो असे त्यांनी मार्गदर्शन प्रसिद्ध मनोविकारतज्ञ व लैंगिक समस्यातज्ञ डॉ अतुल ढगे केले.
राजापूर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या राजापूर हायस्कुल येथे सुलभ सावध किशोरअवस्था या विषयावर दि १८ ऑगस्ट २०२३ रोजी प्रसिद्ध मनोविकारतज्ञ व लैंगिक समस्यातज्ञ डॉ अतुल ढगे यांनी मार्गदर्शन केले त्यावेळी ते बोलत होते.
किशोरअवस्थेत होणाऱ्या विविध शारिरीक, मानसिक, बौद्धिक, लैंगिक व सामाजिक बदल काय असतात, ते कसे ओळखावे, त्याला कसे सामोरे जावे, त्यामुळे काय समस्या येऊ शकतात हे त्यांनी सांगितले. त्यासोबतच व्यसनाधिनता, सोशल मिडिया व त्यामुळे कसे व काय परिणाम आयुष्यावर होऊ शकतात व ते न होऊ देण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या गोष्टींचा सामना कसा करावा व त्यापासून दूर कसे राहावे यासाठी त्यांनी टिप्स दिल्या. ज्युनियर कॉलेजच्या साधारणतः २०० मुली व २०० मुलांनी यांचा लाभ घेतला.
यासाठी राजापूर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री जगदीश भालशंकर, समन्वयक सौ हजेरी मॅडम तसेच शाळेतील इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.