(संगमेश्वर / प्रतिनिधी)
गुंदवली शिवज्योत ग्रुप ची स्थापना २०१४ साली झाली. २०२३ हे वर्ष १० वे वर्ष असून गुंदवली शिवज्योत गृप उपनगराचा मानकरी दशक महोत्सवी वर्ष शिवजयंती ( तिथीनुसार ) निमित्त शिवज्योत दौड असते.
प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या किल्यांवरुन धावती मशाल शिवज्योत आणण्यात येते. ही ज्योत घेऊन यांचे आगमन ४ मार्च रोजी कुडाळ, ५ मार्च रोजी लांजा, ६ मार्च रोजी चिपळूण, ७ मार्च रोजी खेड, असा दिनक्रम करत आज ८ मार्च रोजी माणगांव येथे तर उद्या ९ मार्च रोजी पनवेल असा शिवज्योत दौडचा दिनक्रम सुरू राहणार आहे.
या ग्रुप चे आयोजक संजय चव्हाण, अध्यक्ष श्री.सुरेश कथुरे, सचिव श्री.सागर हर्गुदे, खजिनदार श्री.जयु पांचाळ, सहाय्यक शोएब शेख असून शिवजयंती शिवज्योत १० वर्ष पूर्तीनिमित्त सिंधुदुर्ग किल्ले ते गुंदवली अंधेरी (पूर्व) असा प्रवास अवघ्या १० जणात शीवज्योत मुंबई येथे धावत नेत आहेत. त्यांच्या या कार्याचे ठिकठिकाणी कौतुक व अभिनंदन होत आहे.