(मुंबई)
किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा दुसऱ्यांदा हल्ल्यानंतर दिल्लीत सीआयएसएफच्या हेडक्वार्टरने गंभीर दखल घेतली आहे. झेड सुरक्षा दिलेल्या व्यक्तीचा ताफ्यावर दुसऱ्यांदा हल्ला झाल्याने सीआरपीएफने यासंदर्भात मुंबई पोलिसांना जाब विचारला आहे. सीआयएसएफच्या कमांडरांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांशी चर्चा केली आहे. घडलेल्या घटनेनंतर किरीट सोमय्या यांच्या ताफ्यात असलेल्या प्रत्येक जवानांना कार्यक्रमात अतिदक्ष राहून काम करण्याचे आदेश दिले आहेत.
‘लोकशाही’ या मराठी न्यूज चॅनेलच्या सुत्रांच्या माहितीनुसार किरीट सोमय्या यांच्यावर पुन्हा हल्ला झाला तर शुट एट साईटचे आदेश देण्यात येणार आहे. यावेळी मुंबईत आणि त्याआधी पुण्यात सोमय्या यांच्यांवर हल्ला झाला होता. अद्याप याबाबतचा अधिकृत आदेश समोर आलेला नाही.
याबाबत ‘साम’ टीव्ही सोबत बोलताना सोमय्या यांनी ‘उद्धव ठाकरे, सीआयएसएफ आणि गृहमंत्रालयाला माहीत!’ एवढंच सांगितलं. हल्ल्याची गृह विभागाने गंभीर दखल घेतल्याचेच ते सांगतात. पण शूट अॅट साईटचे आदेश दिले किंवा नाही? यावर उत्तर दिले नाही.