(मुंबई)
भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याकडून पाठपुरावा करण्यात आलेल्या कोर्लईतील १९ बंगले प्रकरणात उद्धव ठाकरेंची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. याप्रकरणी किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा ‘चलो कोर्लई’चा नारा दिला आहे. आज सकाळी ११ वाजता सोमय्या आमदार प्रशांत ठाकूरसह यांचेसह या प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी अलिबाग येथील कोर्लई गावाला जाणार आहेत. या संदर्भात सोमय्या यांनी ट्विट करत माहिती दिली.
https://twitter.com/KiritSomaiya/status/1647430204984557572?s=20
किरीट सोमय्या यांच्या आरोपानुसार माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा रवींद्र वायकर यांच्या नावावर मुरूड तालुक्यातील कोर्लई गावात जमीन खरेदी केली होती. या जागेवर १९ बंगले होते, पण त्याची नोंदणी नाही. रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी २०१४ मध्ये स्व. अन्वय नाईक यांच्याकडून कोर्लई गावातील जागा तिथे झालेल्या बांधकामासह विकत घेतली. त्याची घरपट्टी अन्वय नाईक भरायचे, मात्र नंतर हे प्रकरण अंगाशी येण्याच्या भीतीने उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर २०२२ मध्ये कागदपत्रांमध्ये फेरफार करून बंगल्यांची नोंदणी रद्द केली, असा आरोप सोमय्या यांचा आहे. दरम्यान या प्रकरणी १० एप्रिलला रेवदंडा पोलिसांनी सरपंच प्रशांत मिसाळ यांना अटक केली होती.