(मुंबई)
राज्याच्या राजकारणात खळबळ माजवणारी घटना समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाचे (BJP) ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांचा ‘नको त्या अवस्थेमधील’ व्हिडिओ लिक झाला आहे. या व्हिडीओत सोमय्या आक्षेपार्ह स्थितीत दिसून येत आहेत. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ माजली असून विरोधकांकडून भाजप व सोमय्यावर टीकेटी झोड उठवण्यात येत असून या प्रकाराची चौकशी करण्याची मागणीही केली जात आहे. सोमय्यांबाबतचे हे वृत्त प्रसारित झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. सोशल मिडियावरही याबाबत तीव्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
या घटना कुठे झाल्या, कशा झाल्या. आता याबाबत गृहमंत्रालयाने याविषयी चौकशी केली पाहिजे. आता सगळ्या विषयात साधनशुचितेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपने भूमिका स्पष्ट केली पाहिजे. हा मुद्दा आपण अधिवेशनात उचलणार असल्याचं अंबादास दानवेंनी सांगितले आहे.
किरीट सोमैय्या यांचे आक्षेपाहार्य व्हिडियो @LokshahiMarathi चॅनेल दाखवत आहे. माझ्याकडे @KiritSomaiya यांच्याबाबत अनेक तक्रारी असल्याची माहिती आहे. पण माझ्यासाठी तक्रारी करणाऱ्या त्या महिलांची सुरक्षा अधिक महत्वाची आहे. योग्य व्यासपीठावर मी हा विषय मांडणार आहे. #kiritsomaiyya
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 17, 2023
याबाबत यशोमती ठाकूर म्हणाल्या, ‘‘किळस”वाण्या सोमय्यांची चौकशी झालीच पाहिजे. अनेक नेत्यांवर तथ्यहीन आरोप करून खळबळ माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोमय्यांचा खरा चेहरा यानिमित्तानं सर्वांसमोर आलाय. कोंबडं झाकून ठेवलं तरी आरवायचं राहत नाही. त्यामुळं वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून कितीही दबाव आणला गेला तरी भाजपमधले ‘किळस’ वाणे सोमय्या बाहेर येतच राहणार. नैतिकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी किरीट सोमय्या यांची पक्षातून हकालपट्टी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची हिम्मत दाखवावी. अनेकांचं सार्वजनिक आयुष्य खोट्या-नाट्या आरोपांनी पणाला लावणाऱ्या सोमय्यांनी स्वतःच या प्रकाराबद्दल खुलासा करण्याची गरज आहे. बेंबीच्या देठापासून बेटी बचाओ, बेटी पढाओ म्हणणाऱ्या भाजप च्या नेत्यांच्या अशा कृत्यामुळं बेटी को भाजपा से बचाओ असं दुर्दैवानं म्हणण्याची वेळ आलीय.’
‘किळस’ वाण्या सोमय्यांची चौकशी झालीच पाहिजे
लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीनं भाजपचे नेते डॉ. किरीट सोमय्या यांचा एका महिलेसोबतचा आक्षेपार्ह अवस्थेतील व्हिडिओ चॅट सर्वांसमोर आणल्याबद्दल त्यांचे आभार. अनेक नेत्यांवर तथ्यहीन आरोप करून खळबळ माजविण्याचा प्रयत्न करणाऱ्या सोमय्यांचा खरा… pic.twitter.com/ckYHtKwRGK— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) July 17, 2023
दुसऱ्यांवर चिखल उडविणारे सोमय्या चिखलामध्ये लोळताहेत – विद्या चव्हाण
किरीट सोमय्यांच्या व्हिडीओमुळे मला धक्का बसला आहे. दुसऱ्यांवर चिखल आणि शिंतोंडे उडविणारे सोमय्या स्वतः चिखलामध्ये लोळत आहे. त्यांचे अनैतिक व्यवहार आणि संबंध बाहेर असतील तर दुसऱ्यावर बोलण्याचा काय अधिकार आहे, असा सवाल विद्या चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
हिसाब देना पडेगा – सचिन सावंत
किरीट सोमय्या यांच्याकडे राजकारणात गलिच्छ प्रवृत्ती म्हणून आम्ही पाहतो. सर्वांवर आरोप करतात, दुसऱ्यांची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न करतात,चारित्र्यहानन करत असतात. सुपारी घेतल्याप्रमाणे त्यांचे वर्तन असावं का अशी शंका येते. अशा पध्दतीचं वर्तन त्यांच्याकडून येत तर ते अधिक अधोरेखित होते. ही एक विकृत प्रवृत्ती आहे. हिसाब देना पडेगा, चारित्र्यशुध्द व्यक्तिमत्व आहे की नाही हे जनता ऑडिट करेल,असे सचिन सावंतांनी म्हंटले आहे.