(रत्नागिरी)
नुकताच भैय्याशेठ सांमत यांचा वाढदिवस व जाधव फिटनेस ॲकेडमीचा वर्धापनदिन विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. सुरूवातीला रक्तदान शिबीर घेण्यात आले. त्याचवेळी भैय्याशेठ यांना दीर्घायुष्य मिळविण्यासाठी व खासदार होण्यासाठी येणारे अडथळे दूर होण्यासाठी महामृत्युंजय यज्ञ ॲकेडमीचे सदस्य व कार्यकत्यांच्या हस्ते संपन्न झाला.
सायंकाळी वार्डातील रहिवाशांच्या हस्ते वार्डातील कामांचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर जिल्हास्तरावरील शरीर सौष्ठव स्पर्धांचे सुर्वेसर, महिला आघाडी प्रमुख शिल्पाताई सुर्वे व निलेश लाड यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले.
ॲकेडमी तर्फे एकूण 3 स्पर्धा घेण्यात आल्या. प्रथम लहान मुलांची बाँडीबिंल्डिग स्पर्धा घेण्यात आली. त्याचे टायटल तक्षीत सागर जाधव ने पटकावले, त्यानंतर ॲकेडमी अंतर्गत स्पर्धा घेण्यात आली. त्याचे टायटल गणेश गुरव यांने मिळविले. तसेच जिल्हास्तरावरील स्पर्धेचे टायटल दुष्यंत संदेश पाथरे सी लायन नाटे यांनी मिळविले.
बक्षिस समारंभ असोसिएशनचे पदाधिकारी व वार्डातील रहिवाशांच्या हस्ते संपन्न झाला. त्यावेळी खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून कु. तक्षीत सागर जाधव याला व आर्थिक मागासवर्गीय मदत म्हणून तुकाराम गुरव रा. लांजा यांना प्रत्येकी 5000रू रोख ॲकेडमी तर्फे देण्यात आले. यापुढे ॲकेडमी व भैय्याशेठ सांमत यांचेतर्फे प्रत्येक खेळाच्या स्पर्धांना 5000 रु पाँन्सरशीप दिली जाणार आहे. यावेळी वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस समारंभ करण्यात आले. जाधव फिटनेसचे डायरेक्टर यांनी अशा स्पर्धा दरवर्षी घेत असल्याचे सांगून पुढील वर्षी हा समारंभ अतिभव्य स्वरूपात घेतला जाणार असल्याचे सांगितले.