(गणपतीपुळे / वैभव पवार)
काष्ट्राईब शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा रत्नागिरीची सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ०६ ऑगस्ट २०२३ रोजी कुलकर्णी काळे छात्रालय लांजा येथे काष्ट्राईब कर्मचारी महासंघाचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष सुधाकर कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच काष्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिरीषजी भालशंकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाली. यावेळी थोर पुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून सभेला सुरूवात करण्यात आली. विचारमंचावर उपस्थित मान्यवरांचे स्वागत व सत्कार लांजा तालुका काष्ट्राईब संघटनेच्या वतीने करण्यात आला.
काष्ट्राईब कर्मचारी महासंघाचे राज्याध्यक्ष कृष्णाजी इंगळे यांच्या नेतृत्वाखाली माध्यमिक व उच्च माध्यमिक काष्ट्राईब शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी संघटना कार्यरत आहे. या सभेत संघटनेची ध्येय आणि धोरणे तसेच संघटना वाढीसाठी राज्याध्यक्ष यांनी घेतलेले परिश्रम याविषयी अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. या सभेला प्राथमिक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कांबळे, काष्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कार्याध्यक्ष डॉ. बी. आर. चव्हाण, काष्ट्राईब कर्मचारी महासंघाचे कोषाध्यक्ष संतोष पडवणकर, काष्ट्राईब शिक्षक संघटनेचे कायदेशीर सल्लागार केशवराव गायकवाड, शाळा समिती कोंडगेचे अध्यक्ष एस् के जाधव, सागवे हायस्कूलचे मुख्याध्यापक भारत कांबळे, जिल्हा सचिव प्रकाश पांढरे, जगदीश भालशंकर, राजेश कांबळे, विनोद सांगावकर, अमोल सरनोबत तसेच बहुसंख्येने तालुका पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
या सभेत आदरणीय सुधाकरजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. नूतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जिल्हाध्यक्ष शिरीष भालशंकर, जिल्हा सचिव प्रकाश पांढरे, कार्याध्यक्ष राजेश कांबळे, उपाध्यक्ष विनोद सांगावकर, उपाध्यक्ष भारत कांबळे, उपाध्यक्ष रशिद तडवी, सहसचिव सुवेश चव्हाण, कोषाध्यक्ष अमोल सरनोबत, सदस्य शिवाजी नागरवाड, संजय पाटील, जिल्हा संघटक विक्रम कांबळे तसेच कायदेशीर सल्लागार केशवराव गायकवाड
यावेळी रत्नागिरी काष्ट्राईब शिक्षक संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी आयु. एस्. के. जाधव (वरवडे, खंडाळा), लांजा तालुका अध्यक्षपदी आयु. संतोष कांबळे, राजापूर तालुका अध्यक्षपदी जगदीश भालशंकर तसेच राजापूर तालुका सचिवपदी एन. एस. कांबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या संपूर्ण सभेचे सूत्रसंचालन रमेश कांबळे यांनी तर संपूर्ण सभेचे उत्तम नियोजन व व्यवस्था लांजा तालुका काष्ट्राईब संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी केली. संघटना वाढीसाठी सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन यावेळी काष्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात आले.तसेच लवकरच लांजा, राजापूर, संगमेश्वर आणि रत्नागिरी तालुका कार्यकारिणी तयार केली जाणार आहे.