( रत्नागिरी )
तालुक्यातील काळबादेवी शेट्येवाडी येथे अवैधरित्या गावठी दारू बाळगणाऱ्यावर ग्रामीण पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला. दिलीप – रघुनाथ मयेकर (६३, रा. काळबादेवी शेट्येवाडी) असे संशयिताचे नाव आहे. गुरुवारी दुपारी पोलिसांकडून छापा टाकून ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काळबादेवी येथे अवैधरित्या गावठी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार ९ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी १ च्या सुमारास पोलिसांकडून छापा टाकण्यात आला. यावेळी दिलीप याच्या ताब्यात पोलिसांना अवैध गावठी दारू आढळून आली. पोलिसांनी याप्रकरणी दिलीप याच्याविरूद्ध महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम ६५ ई नुसार गुन्हा दाखल केला.