(खेड)
खेड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने काळकाई कला क्रीडा केंद्र भरणे आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत रोमहर्षक झालेल्या अंतिम सामन्यात यजमान काळकाई भरणे संघाने प्रथम तर भैरवनाथ क्रीडा मंडळ चिंचघर संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. नवनाथ क्रीडा मंडळ चिंचघर व झोलाई युवा प्रतिष्ठान आंबवली या संघांना अनुक्रमे तृतीय व चतुर्थ क्रमांक पटकाविला. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या संघांना रोख रक्कम व भव्य चषक देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून शुभम बिरजे,उत्कृष्ट पकड रितेश बिर्जे, सर्वोत्कृष्ट चढाई म्हणून साहिल दळवी यांना आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेचे उद्घाटन दापोली विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय मा. आमदार श्री.संजयराव कदम यांच्यासोबत हस्ते पार पडले. याप्रसंगी भरणे ग्रामपंचायत सरपंच संदीप खराडे, माजी सरपंच राजाभाऊ बैकर, राष्ट्रीय प्रशिक्षक दत्ताराम पारकर, खेड तालुका कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष आनंद हंबीर, सदस्य दीपक यादव, मधुकर शिंदे, समद बुरोडकर, सुभाष आंबेडे, दाजी राजगुरू, भाऊ फागे,आत्माराम बैकर, रत्नागिरी जिल्हा माध्यमिक पतपेढी संचालक श्री.अमित कदम,ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र शिर्के,काळकाई देवस्थान सचिव सुजित शिंदे, विनय पाटील, पांडुरंग विटमल, राजेंद्र शिर्के, सुजित फागे, रवींद्र बैकर, अभिजीत कानडे, वासुदेव भोसले उपस्थित होते.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण हॉटेल काळकाई कृपाचे मालक श्री.दीपक पाटणे, भरणे ग्रामपंचायत सदस्य संतोष गोवळकर व प्रमोद बाईत, दत्ताराम पारकर, राजाभाऊ बैकर, दिलीप कारेकर, अभिजीत कानडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.
स्पर्धेला पंचायत समिती माजी सभापती सौ.मानसी जगदाळे खेड तालुका कबड्डी चे असोसिएशनचे अध्यक्ष श्री. सतीश (पप्पू) चिकणे अध्यक्ष टीबीके महाविद्यालयाचे प्राचार्य श्री.साळुंके सर,भरणे ग्रामपंचायत उपसरपंच राजू मोरे, सदस्य सौ.ललिता जाधव,महेश जगदाळे, काळकाई देवस्थानचे अध्यक्ष सचिन जाधव, नंदू साळवी,विजय फागे, राष्ट्रीय कबड्डी पंच संजय जाधव, जनार्दन पड्याळ, सुनील निर्मळ, उमेश नक्षे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रम प्रसंगी उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रो कबड्डी पंच आशुतोष साळुंखे व विलास बेंद्रे, तायक्वांदो राष्ट्रीय खेळाडू संकेत फागे यांना माजी आमदार संजयराव कदम यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
मंडळाचे श्री.दत्ताराम बैकर, अनंत कोठारे, सुभाष आंबेडे, समद बुरोडकर, मधुकर शिंदे, संजय डांगे मंगेश शिंदे, सुजित फागे, सुजित शिंदे, रवींद्र बैकर, विनय पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली स्पर्धा पार पडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी राकेश बैकर, प्रदीप कोठारे, विनायक फागे, समीर शिंदे, आशिष शिंदे, सुदर्शन गोळकर, शुभम बिर्जे, सुरज जाधव, स्वप्नील बैकर, अभिषेक बैकर, रितेश बिर्जे, अथर्व धुमाळ, साहिल कडव, साहिल जड्याळ यांनी मेहनत घेतली.
स्पर्धेत पंच प्रमुख म्हणून दाजी राजगुरू पंच श्री.आशुतोष साळुंखे, विलास बेंद्रे, राजेंद्र चांदिवडे, शरद भोसले, सिद्धाराम चढलोड, स्वप्नील शिंदे, संतोष शिर्के यांनी काम पाहिले.