( ठाणे/उदय दणदणे )
मुंबईतील नाट्यगृहात आजच्या घडीला सर्वाधिक हाऊसफुल्ल आणि तुडुंब गर्दीत ज्या लोककला कोणत्या सादर होत असतील तर त्या आहेत कोकणातील बहुप्रिय लोककला नमन आणि कलगी-तुरा (जाखडीनृत्य) अर्थात शक्ती-तुरा या लोककलांना हा बहुमान मिळत असून त्यात आयोजकांचेही मोठे योगदान आहे.
मुबंई रंगमंचावर २०२२ या मोसमात सातत्य राखत शक्ती-तुरा सामन्याचे आयोजन करणारे जय गणेश मित्र मंडळ व कोकणातील जेष्ठ लोककलावंत / आयोजक- श्री दिलीप नामे आणि सहकारी यांच्या माध्यमातून या मोसमात शक्ती-तुरा कार्यक्रमाचा पहिला शुभारंभाचा प्रयोग जून महिन्यात झाला होता आणि आता सोमवार दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी रात्रौ ०८-३० वा. दामोदर नाट्यगृह परेल मुंबई येथे स्वतंत्र दिनाच्या शुभमुहूर्तावर या मोसमातील शेवटचा आणि तब्बल ०५ वा शक्ती-तुरा सामन्याचा प्रयोग कोकणातील सुप्रसिद्ध युवा शाहिर त्यात सप्तसुरांचा बादशहा अशी ख्याती असणारे शक्तीवाले शाहिर- राजेश निकम शाखा- श्री सुंकाई देवी नृत्य कलापथक-मुंबई (अडुर) आणि गोड आवाजाचे गायक स्वरसम्राट तुरेवाले शाहिर- विनेश तांबे शाखा- श्री सोनगाई देवी नृत्य कलापथक कौंढर-काळसुर ता – गुहागर या दोन सुप्रसिद्ध शाहिरांच्या ही जुगलबंदी होणार असून स्वतंत्र दिनी सूर आणि तालाच्या मैफलीत रसिकांच परिपूर्ण मनोरंजन होईल आणि हा कार्यक्रम विक्रमी गर्दीत हाऊसफुल्ल होईल अशी अवघ्या कोकण कला विश्वामध्ये चर्चा आहे.
हा सुपरहिट सामना, कलाप्रेमी रसिकांनी आवर्जून बघावा असे अवाहान श्री जय गणेश मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.अधीक माहितीसाठी-दिलीप नामे-९८१९७३५०१२, योगेश महाडिक- ९८७०३२६८७४, बबन डाफळे -८२९१३५६८९०, व्ही डी नामे-७०२१४५२३०५, रुपेश बाऊल-९८३३२४२३७६, सचिन मालप-९९३००५९०३८ या नंबर वर संपर्क साधावा असे आयोजकांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.