(मुंबई)
दिशा सालियन बाबत प्रश्न विचारले असता शर्मिला ठाकरे यांनी ‘आदित्य असं काही करेल, असं मला वाटत नाही’ अशी प्रतिक्रिया माध्यमांसमोर दिली होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शर्मिला ठाकरे यांचे आभार मानले. उद्धव ठाकरे यांनी मांडलेल्या आभारावरून शर्मिला ठाकरे यांनी त्यांच्यावर उलट प्रश्न विचारत टीका केली आहे. ‘मी माझ्या पुतण्यावर विश्वास ठेवला, पण तुम्ही तुमच्या लहान भावावर विश्वास ठेवला का? असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांनी राज यांच्यावर केलेल्या टीकेला शर्मिला ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. शर्मिला ठाकरे म्हणाल्या की, उद्धव ठाकरेंनी आभार मानायची संधी कधीच आम्हाला दिली नाही. लहान भावाला कायम बोलतात, टोमणे मारायची संधी सोडत नाहीत. मी माझ्या पुतण्यावर विश्वास दाखवला मात्र, आम्हाला अजून आभार मानायची वेळ आली नाही. लहान भावाला कायम बोलतात, टोमणे मारायची ते मात्र एकही संधी सोडत नाहीत.
‘मी अदानींना प्रश्न केला, तर चमचे का वाजू लागलेत’ अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर केली. उद्धव ठाकरे यांनी धारावीचा विराट मोर्चा काढला होता. त्या संदर्भात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती की, आत्ताच महाविकास आघाडीला जाग का आली आणि आत्ताच अदानीविरुद्ध ते का बोलत आहेत? या प्रश्नामुळे उद्धव ठाकरे यांनी चमचे का वाजू लागलेत? अशी टीका राज ठाकरेंवर केली. त्यानंतर उद्धव ठाकरे अडीच वर्ष मुख्यमंत्री होते त्यांचे कोणी हात धरले होते का? चांगले निर्णय त्यांनी घ्यायला पाहिजे होते. त्यांना कोणी थांबवलं नव्हतं. सर्व विरोधी पक्षनेते म्हणतात, आरक्षण द्या आपण मराठा आरक्षण त्यांनी का दिलं नाही? शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत बसली होती, धारावीचा पुनर्विकास करायचा होता मग तुम्ही का केला नाही? असा सवाल शर्मिला ठाकरे यांनी केला आहे.