(देवरूख/सुरेश सप्रे)
महाराष्ट्र राज्य परीवहन मंडळाच्या कामगार संघटनेचे व मराठा समाजाचे क्रियाशील नेतृत्व केलेले कामगार नेते अनिल जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
रा. प. म. व क्षत्रिय मराठा संघटनेसाठी तन मन धन अर्पून काम करून आपला वेगळा ठसा उमटवणारे श्री अनिल जाधव यांचे रविवारी रात्रौ दुःखद निधन झाले. त्यांनी रा. प. म. च्या कामगार संघटना व कामगार सेना या संघटनेचे नेतृत्व केले. तसेच सामाजिक कामाबरोबरच तालुका क्षत्रिय मराठा समाज, कोसुंब गावच्या कोणतेही उपक्रम असोत की कामगांराचे ज्वलंत प्रश्न असोत यात त्यांचा कायम पुढाकार असे. अशा या महान व्यक्तीमत्वाचे निधन झाल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त करणेत येत आहे.
देवरूखातील मराठा समाजाचे मराठा भुवन उभारणीत कै. अप्पा जाधव, माजी मंत्री रविंद्र माने, माजी आम. सुभाष बने, आबा सावंत यांचेसह काम करून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांचे मोठे योगदान दिले होते. सेवानिवृत्ती नंतर ही त्यांनी एस टी. ची सेवानिवृत्त संघटना स्थापना करून जिल्हातील निवृत्त कर्मचारेंचे प्रश्न सोडविण्यासाठी मोठे योगदान दिले. कोसूंब गावच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे.
त्याचे अंत्ययात्रेत माजी आमदार व मराठा समाजाचे नेते सुभाष बने, दिलिप जाधव, निवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष विजयराव शिंदे, उपाध्यक्ष अनिल रहाटे तसेच कोसूंब गावातील प्रतिष्ठित नेते व ग्रामस्थ हजर होते. कोसूंब स्मशानभुमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी त्यांना श्रध्दांजली वाहणेत आली.