(चिपळूण)
चिपळूण येथील मुंबई गोवा महामार्गावर कापसाळ येथे सोमवारी (१८ सप्टेंबर) सकाळी ६:३० वाजता एसटी बस आणि कंटेनरची समोरासमोर धडक बसून अपघात झाला होता. याप्रकरणी एसटी चालक चंद्रकांत शिवाजी वारे (रा. जामखेड डेपो, अहमदनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई ( दिवा) येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे चंद्रकांत वारे हे आपल्या ताब्यातील एसटी बस (एमएच ६६ बीएल ४२६६) घेऊन जात होते. मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनर (एमएच ४६ एआर ८१११) ला धडक बसली. ही धडक इतकी जोरदार होती की, कंटेनर रस्त्याच्या कडेला फेकला गेला होता. एसटीचेही मोठे नुकसान झाले. चंद्रकांत वारे याने त्याच्या ताब्यातील बस चुकीच्या दिशेने घेऊन जात असताना हा अपघात घडला.