(रत्नागिरी)
जिल्ह्यातून प्रतिवर्षी दीड ते 2 कोटींहून अधिक उत्पादन काजू पिकातून मिळते. काजू तारण कर्ज योजनेंतर्गत शेतकर्यांनी 52 लाख 87 हजार 110 रुपये नफा झाला. 20-21 मध्ये 19 शेतकर्यांनी 1800.36 क्विंटल काजू तारण ठेवला होता. यातून 1 कोटी 51 लाख 69 हजार 530 रुपये तारण रक्कम मिळाली होती. शेतमाल विकीतून 2 कोटी 47 लाख 56 हजार रक्कम मिळाली होती.
काजूला चांगला दर मिळाल्यानंतर त्याची विक्री करण्यात येते. शेतकऱ्यांकडे काजू साठवणुकीच्या सुविधा नसतात. अशावेळी सुगीच्या कालावधीत काजू एकाचवेळी विक्रीसाठी येतो. त्यामुळे बाजारभाव कमी होतो व शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. हे टाळण्यासाठी या योजनेद्वारे काजू बी तारण ठेवण्याचे आवाहन जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने करण्यात आले आहे.