(संगमेश्वर)
भाजपा रत्नागिरी (द.) महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हा सरचिटणीस सौ. नुपूरा मुळ्ये यांच्या नेतृत्त्वात भाजपा संगमेश्वर (उत्तर) महिला मोर्चा, युवा मोर्चा तसेच अन्य पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संगमेश्वर एस.टी. बसस्थानकाच्या परिसरात झारखंड काँग्रेसचे नेते, तीन वेळचे राज्यसभा खासदार यांच्या निवासस्थानी आयकर विभागाने टाकलेल्या धाडीत अवैध संपत्ती प्राप्त झाल्याबद्दल आक्रमक निदर्शन करून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
माजी सरपंच व भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष संजय (बापू) सुर्वे यांनी तीव्र भावना व्यक्त करत काँग्रेसवर हल्लाबोल चढवला. यावेळी ते म्हणाले, “एका खासदाराकडे एवढी संपत्ती असेल तर मागील ६०-६५ वर्षांच्या काळात यांनी किती संपत्ती आपल्या तिजोरीत बंद करून ठेवली असेल याचा विचार न केलेलाच बरा.” या निदर्शनात अग्रभागी असणाऱ्या सौ. मुळ्ये म्हणाल्या, “आजच्या या प्रसंगातून एक गोष्ट सिद्ध झाली, ती म्हणजे काँग्रेस ‘मोहोब्बत की दुकान’ नाही तर ‘भ्रष्टाचार की दुकान’ आहे. आज आम्ही सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी खासदार धीरज साहू यांच्या प्रतिमांचे दहन केले आहे; २०२४ ला सर्वसामान्य जनता काँग्रेस चे दहन करणार हे निश्चित.” यावेळी त्यांनी ‘अब की बार, मोदीजी ४०० पार’ असा नाराही दिला.
चिपळूण विधानसभा युवा मोर्चा निवडणूक प्रमुख अविनाश गुरव, रत्नागिरी (द.) जिल्हा चिटणीस सौ. कोमल रहाटे, महिला मोर्चा जिल्हा चिटणीस सौ. सरिता आंबेकर, महिला मोर्चा तालुका उपाध्यक्षा सौ. सुमन झगडे, सौ. आराध्या निकम, ग्रा.पं. माभळे सदस्या व भाजपा कार्यकर्त्या सौ. मुग्धा भिडे, सौ. वंदना रहाटे, सौ.पूर्वा करमरकर, संगमेश्वर (उ.) सरचिटणीस मिथुन निकम, उपाध्यक्ष राजेश आंबेकर, अजिंक्यराज सुर्वे, भाजयुमो तालुकाध्यक्ष स्वप्निल सुर्वे, आय.टी. सेल संयोजक मयूर निकम, सोशल मीडिया संयोजक मयुरेश मादुस्कर, विनेश चीले, हेरंब भिडे, श्री. दिपक चाळके, मुरलीधर चाळके, अभिषेक जाधव, दयानंद रहाटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बसस्थानकावर कार्यकर्त्यांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे तो परिसर लोकांचा केंद्रबिंदु बनला होता.