(चिपळूण / ओंकार रेळेकर)
काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी कळवंडे येथील सुनीलभाऊ सावर्डेकर यांची नुकतीच निवड झाली आहे. ही निवड ऑल इंडिया काँग्रेस कमिटी अनुसूचित जातीक विभागाचे अध्यक्ष राजेश लिलोथिया यांनी जाहीर केली आहे.
कळवंडे येथील व व्यवसाय निमित्त मुंबईत वास्तव्यास असलेले सुनीलभाऊ सावर्डेकर हे गेली काही वर्ष सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती विभाग सरचिटणीस व रत्नागिरी जिल्हा प्रभारी पदाची जबाबदारी सांभाळताना रत्नागिरी जिल्ह्यातील अनुसूचित जाती विभागातील समाज बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले. कोरोना काळ असो अथवा चिपळूण महापूर काळ असो, या कालखंडात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वसामान्यांना अनुसूचित जाती विभागाच्या माध्यमातून सहकार्याचा हात दिला आहे. अनुसूचित जाती विभागात च्या वस्त्यांमधील विकासात्मक प्रश्नांनादेखील चालना मिळावी ते यासाठी शासन प्रशासनाचे नेहमीच सुनीलभाऊ सावर्डेकर यांनी लक्ष वेधले आहे. काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागातील प्रांत अध्यक्ष श्री सिध्दार्थ हातीअंबिरे कामगिरीची दखल घेऊन आता सुनीलभाऊ सावर्डेकर यांची या विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या निवडीबद्दल सुनीलभाऊ सावर्डेकर यांच्यावर अभिनंदनचा वर्षा होत आहे.
या निवडीबद्दल प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, नेते राहुल गांधी, राष्ट्रीय अध्यक्ष मलिकार्जुन खर्गे तसेच अनुसूचित जाती विभागाचे वरिष्ठ नेते यांनी आपल्यावर वेळोवेळी अनुसूचित जाती विभागाची जबाबदारी सोपवली या पदांना न्याय देण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केले. यामध्ये काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे नेहमीच सहकार्य मिळाले. आता पक्षाने अनुसूचित जाती विभागाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवून मोठा विश्वास दाखवला आहे. हा विश्वास सार्थकी ठरवण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही दिली आहे.