(बंगळूरू)
कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी म्हटले की, काँग्रेसने निवडणुकीदरम्यान दिलेली पाच आश्वासने या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण करण्यात येणार आहेत. शुक्रवार दि. २ जून रोजी रोजी कर्नाटक मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी म्हटले आहे की निवडणुकीच्या आधी आणि त्यादरम्यान आम्ही पाच आश्वासन जनतेला दिली होती.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार आणि मी आश्वासन पत्रांवर सही देखील केली होती आणि ही सगळी आश्वासने पूर्ण करून त्यांनी लोकांपर्यंत पोहचवण्याचा विश्वास देखील आम्ही दिला होता. तेव्हा आम्ही या आश्वासन पत्रांचे वाटप देखील केले होते. काँग्रेसचा मंत्रिमंडळाचा विस्तार काही दिवसांपूर्वी करण्यात आला होता. त्यांनंतर खातेवाटप देखील करण्यात आले होते. त्यामुळे आता कर्नाटक मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे म्हटले जात आहे.
11 जून ते 15 ऑगस्टपर्यंत 4 योजना लागू, 5 वीसाठी अर्ज मागवणार
1. सखी शक्ती योजना: सर्व प्रथम, सखी शक्ती योजना 11 जून पासून लागू होत आहे. याअंतर्गत कर्नाटकातील महिलांना राज्य परिवहन बसमधून राज्यात कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे.
2. गृह ज्योती योजना : ही योजना 1 जुलैपासून लागू होत आहे. याअंतर्गत घरगुती ग्राहकांना 200 युनिटपर्यंत मोफत वीज मिळणार आहे. मात्र, त्यांना त्यापूर्वीचे बिल भरावे लागेल.
3. अन्न भाग्य योजना: ही योजना देखील 1 जुलैपासून लागू केली जाईल. या अंतर्गत सर्व बीपीएल कार्डधारकांना प्रति व्यक्ती 10 किलो धान्य दिले जाईल. भाजप सरकारमध्ये 5 किलो मिळत असे.
4. गृह लक्ष्मी योजना : ही योजना 15 ऑगस्टपासून लागू होणार आहे. या अंतर्गत कुटुंबातील महिला प्रमुखाला दरमहा 2 हजार रुपये मिळणार आहेत. 15 जून ते 15 जुलै या कालावधीत अर्ज मागविण्यात आले आहेत.
5. युवा निधी योजना: या योजनेअंतर्गत, बेरोजगार पदवीधरांना 3,000 रुपये आणि पदविकाधारकांना 2 वर्षांसाठी 1,500 रुपये मासिक भत्ता दिला जातो. यासाठी सरकारने अर्ज मागवले आहेत. मात्र, त्याची अंमलबजावणी कधी होणार, याची तारीख देण्यात आलेली नाही.
मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी म्हटले की अन्न भाग्य योजनेअंतर्गत १ जुलैपासून दारिद्रय रेषेखालील सर्व शिधापत्रिका धारकांना दहा किलो तांदूळ मोफत देण्यात येतील. तसेच गृहलक्ष्मी योजना ही १५ ऑगस्टपासून सुरु करण्यात येईल असे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी म्हटले. कोणत्याही जाती-धर्माचा भेदभाव न करता या पाच निर्णयांना अमलात आणण्यात यावे असे मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांनी मंत्रिमंडळ बैठकीत म्हणाले आहेत. शक्ती योजनेअंतर्गत एक जून पासून सर्व महिलांना कर्नाटकातील सार्वजनिक बसमधून मोफत प्रवास करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.