(रत्नागिरी)
कशेळी ते रत्नागिरी मार्गावर कसोप फाटा येथे दुचाकीमध्ये झालेल्या अपघात प्रकरणी अज्ञात दुचाकीचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. अपघाताची घटना ११ डिसेंबर २०२२ रोजी घडली होती. यामध्ये दुचाकीवरील दत्ताराम मारुती फोडकर (६०.रा. कशेळी ता. राजापूर) हे जखमी झाले होते. फोडकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दत्ताराम फोडकर हे ११ डिसेंबर २०२२ रोजी दुचाकीवरून कशेळी ते रत्नागिरी असे जाते होते. त्यांचे घराशेजारी राहाणारे जितेंद्र अशोक पाटील यांची दुचाकी (एमएच ०८ एक्स ५३४०) वरून फोडकर हे जात होते. सकाळी १० च्या सुमारास त्यांची दुचाकी कसोप फाटा येथे आली असता अज्ञात दुचाकीचालकाने त्यांच्या दुचाकीला ठोकर दिली. या अपघातात फोडकर हे खाली पडून गंभीर जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांकडून अज्ञात दुचाकीचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास करण्यात येत आहे.