(संगलट/प्रतिनिधी )
मुंबई ते खेड असा दुचाकीने प्रवास करीत असताना भोगाव ते खवटी मार्गे कशेडी बोगद्यातून प्रवास करीत असताना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात मंदा मधुकर शिरिषकर (वय 50), प्रथमेश मधुकर शिरिषकर (वय 23) दोन्ही रा. खेड यांना दुखापती झाल्या असुन दुखापतग्रस्तांना नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहीकेने कळंबणी बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज बुधवार दि. 20/9/2023 रोजी दुपारी 2.00 सुमारास घडला. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.
अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई खेड असा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरून एमएच 08 AC 3001 या दुचाकीवरून जखमी मायलेक प्रवास करीत असताना कशेडी घाटाला पर्यायी मार्ग असलेल्या आणि एक मार्गिका सुरु झालेल्या भोगाव ते खवटी अशा कशेडी बोगद्यातून प्रवास करीत असताना बोगद्यात दुचाकी घसरून झालेल्या अपघातात खेडचे मायलेक मंदा मधुकर शिरिषकर आई व मुलगा प्रथमेश मधुकर शिरिषकर या दोघांना दुखापती झाल्या असुन दुखापतग्रस्तांना नरेंद्र महाराज संस्थानच्या रुग्णवाहीकेने कळबणी बुद्रुक येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस करीत आहेत