(संगलट – खेड / इक्बाल जमादार)
मुंबईतून गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या मुंबईकरांचा प्रवास आता अधिक सुखकर होणार आहे. मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी घाटात तयार करण्यात आलेल्या बोगद्यातील एक मार्गिका आज सोमवार (११ सप्टेंबर) पासून हलक्या वाहनांसाठी सुरू करण्यात आली आहे. यामुळे घाटातील अवघड वळणापासून प्रवाशांची सुटका झाली आहे.
गणेशोत्सवासाठी दरवर्षी लाखो भाविक कोकणात आपल्या मूळ गावी सण साजरा करण्यासाठी येतात. उत्सवासाठी स्वतः चे किंवा भाड्याने छोटे चारचाकी वाहन घेऊन गावी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, अवघड वळण आणि खड्डेमय रस्ता यामुळे गावी येणाऱ्या मुंबईकरांचे हाल होत होते. हे हाल थांबविण्यासाठी चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातच कशेडी घाटातील अवघड वळणाचा त्रास कमी करण्यासाठी बोगदा तयार करण्यात आला आहे.
या बोगद्याची लांबी १.७१ किलोमीटर इतकी आहे.गेली तीन वर्षे या बोगद्याचे काम सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वी या बोगद्यातील एक मार्गिका सुरू करण्याचे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला होता. त्यानुसार सोमवारपासून एक मार्गिका हलक्या वाहनांसाठी खुली करण्यात आली