(खेड)
महामार्गावरील अवघड कशेडी घाट उतरत असताना नियंत्रण सुटल्याने इंधनवाहू टँकर पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक कमलेश वैजनाथ हा जखमी झाला. रविवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील शिवडी येथून इंधन भरलेला टँकर घेवून कमलेश वैजनाथ हा चालक गोव्याला जायला निघाला होता. दुपारच्या सुमारास तो कशेडी घाट उतरत असताना त्याचा टँकरवरील ताबा सुटला आणि टँकर रस्त्याची कडेला पलटी झाला. या अपघात टँकरमधील इंधन रस्त्यावरून वाहून गेले.
अपघाताची खबर मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. जखमी चालक कमलेश याला जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या रुग्णवाहिकेने कळंबणी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.