(खेड)
खेडमध्ये कशेडी घाट उतरणार्या एका टेम्पोचा विचित्र अपघात झाला. चिपळूण दिशेने कशेडी घाट उतरणार्या टेम्पोने तीन वाहनांना दिलेल्या धडकेत चारही वाहनांचे नुकसान झाले तर एक चालक जखमी झाला आहे.
भिवंडी येथून गोव्याकडे जाणार्या आयशर टेंपो (जीए ०४ टी ४५६१) चालक योगेश बाजीराव राजपुरे (२४, महाबळेश्वर, जि. सातारा) हा घाटातील महामार्ग पोलीस केंद्राजवळ आला असताना मुंबईकडे जाणार्या ट्रक (एमएच १९ झेड) ला चालकाच्या बाजूला टेम्पोची धडक बसली. त्यामुळे अनियंत्रित झालेल्या टेम्पोने पुढे जावून मुंबई बाजूकडे येणारा टँकर (एमएच ०१ डी आर ०९०५) च्या चालकाच्या बाजूला ठोकर दिली. त्यापुढे जावून मुंबईच्या दिशेने येणारा आयशर टेम्पो (एमएच ०८ एपी ५९६४) या गाडीच्या चालकाच्या बाजूला धडकून टेम्पो थांबला.
या अपघातामध्ये अपघात करणारा आयशर टेप्पोवरील चालक योगेश बाजीराव राजपुरे याला दुखापत झाली असून त्याला तत्काळ नरेंद्र महाराज ऍम्बुलन्सने उपजिल्हा रूग्णालय कळंबणी येथे उपचारासाठी पाठविण्यात आले.