( इक्बाल जमादार / खेड )
रत्नागिरीतून ठाणे येथे कोवीड किट घेऊन जाणाऱ्या अॅम्ब्युलन्सला अपघात होऊन एकजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.
सविस्तर वृत्त असे की, ॲम्बुलन्स ( क्र. MH 08/AP/3894) ही चालक निखिल नवनाथ शिबिलकर ( वय- २८,रा.रत्नागिरी) हा आपल्या ताब्यातील अॅम्ब्युलन्स घेऊन ठाणेच्या दिशेने जात होता. या अॅम्ब्युलन्समध्ये वाॅर्डबॉय अमित मनोज जाधव (वय-४० रा. रत्नागिरी) हाही होता. ठाणे येथे कोविड किट घेऊन जाताना सकाळी ०७.४५ वा. सुमारास कशेडी हॉटेल अनुसयाचे समोर चालकाचा गाडीवरील ताबा सुटून ॲम्बुलन्स रस्त्याचे बाजूला खड्ड्यात पलटी झाली. या अपघातात वॉर्ड बॉय अमित जाधव त्याचे डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले असून चालक निखिल सिविलकर याला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही. ॲम्बुलन्स किरकोळ प्रमाणात नुकसान झालेले असुन अपघाताचे घटनास्थळी वाहतूक सुरळीत चालू आहे.