(खेड)
मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपुर तालुक्यातील तेलंगेवाडी जवळील वळणावर कशेडी घाटात मंगळवार, दि. १६ रोजी सकाळी १०.३० वाजता दोन मोटारी समोरासमोर धडकल्या. पुण्याहून दापोलीच्या दिशेने जाणारी मोटार (एमएच ४२ के ३०८०) व खेडहुन कसारा मुंबईच्या दिशेने जाणारी मोटार (एमएच ०४ ए एम ६८८९) समोरासमोर धडकल्याने हा अपघात कशेडी घाटातील तेलंगेवाडी जवळील वळणावर घडला.
या अपघातात १) गौरव गणेश बिवकर (वय ४० रा. पुणे), २) साक्षी संजय पवार (वय ३५, रा. पुणे), ३) वनिता विजय सावंत (वय ४५ कसारा- मुंबई), ४) आदिल विजय सावंत (वय २५), ५) आदिलिसा आदिल सावंत (वय २६), ६) प्रेक्षक महेश सावंत (वय १९) असे एकूण ६ प्रवासी जखमी झाले आहेत.
जखमींना पोलादपुर येथील शासकीय रुग्णालयात जगदगुरू नरेद्र महाराज संस्थान नानिजधामच्या मोफत रुग्णवाहिकेने मुकुंद मोरे यांनी उपचारार्थ दाखल केले. अपघातस्थळी कशेडी वहातूक पोलिस यांनी मदत केली. तसेच त्यांनी घाटातील वहातूक सुरळीत सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला.