( संगलट-खेड / इक्बाल जमादार )
खेड तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावरील महामार्ग क्रमांक 55 वरील कशेडी घाट खासगी बस (नंबर एमएच 09/CV 7029) वरील चालक ओंकार रमेश अदावडे (वय 24 रा. पाळपेणे, ता गुहागर जि रत्नागिरी) हा आपल्या बस चालवीत कशेडी घाट चढत असताना बसचा मेन लाईनचा बुस्टर पाईप फाटल्याने बस आपोआप पाठीमागे येण्यास सुरुवात झाली. बस चालक ओंकार रमेश अदावडे यांनी प्रसंगावधान राखून बस उभी करून बसचा अपघात होताना टाळला आणि बसमधली 39 प्रवाशांचे प्राण वाचले. या प्रकाराने प्रवाश्यांनी सुस्कारा सोडला.
हा अपघात सोमवार दिनांक 14.11.2022 रोजी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास घडला. पाळपेणे ता गुहागर ते विरार या मार्गावरील कशेडी घाट चढत असताना कशेडी आंबा या घाटातील अवघड वळणावर बसचा मेन लाईनचा बुस्टर पाईप फाटल्याने बस पाठीमागे येत असताना बसला अपघात झाला. सुदैवाने यामध्ये मनुष्यहानी झाली नाही.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहीतीवरून मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर कशेडी आंबा ठीकाणी श्री लक्झरी बस क्रमांक MH09CV7029 वरील चालक ओंकार रमेश आदवडे हा गुहागर ते विरार असा चालवत घेवुन जात असताना. वरील नमुद ठीकाणी आल्यावर लक्झरी चा मेन लाईन फाटल्याने बस पाठीमागे आल्याने अपघात झाला. बसमध्ये 39 प्रवासी असुन कोणालाही दुखापत झाली नाही. तर या अपघातामध्ये बसचे कीरकोळ नुकसान झाले आहे.
अपघाताची माहीती कशेडी घाट मदत केंद्र कशेडीचे पोलीस उपनिरीक्षक अजित चांदणे, सहाय्यक पोलीस फौजदार समेल सुर्वे, रमागडे, मोरे, माजलकर, अपघातस्थळी दाखल होऊन मदतकार्य करून वहातुक सुरळीत सुरू ठेवण्याचे काम करून वहातुकीवर नियंत्रण ठेवले.