(गणपतीपुळे / वैभव पवार)
रानातील कवी, निसर्गातील कवी, पावसातील कवी ,गावातील गोष्टीकार ,लोककथाकार, निसर्गभान जागविणारे कवी, ग्रामीण संवेदनशील कवी, आपल्या मातीशी आणि बोलीभाषेच्या सहजतेशी जिवंत शब्दकळा जागृत करणारे महानोर कवी तथा साहित्यिक कविवर्य नामदेव धोंडो महानोर यांचे 3 ऑगस्ट 2023 रोजी निधन झाले. या कालकथित श्रेष्ठ कवींच्या कवितांचे वाचन करून त्यांची अजरामर झालेली नभ ओथंबून आले, “आम्ही ठाकर ठाकर “अशी गीते ऐकून वरवडे येथील माध्यमिक विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी श्रद्धांजली वाहिली.त्यानंतर इयत्ता नववीच्या आर्या बोरकर, सलोनी गुरव, बिंदिया गावणकर, वैभव चौगुले, आर्यन गुरव, सुमित गुरव, साहिल घवाळी यांनी आपल्या भाषणरुपी मनोगतातून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
याच आदरांजली कार्यक्रमात कविवर्य ना.धों.महानोर यांची प्रतिमा (फोटो) इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयाला भेट दिली.यावेळी प्रतिमापूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशांत विचारे यांनी केले. हा संपूर्ण आदरांजली कार्यक्रम मराठी विषयाचे विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक राजेश जाधव यांनी “का कुणास ठाऊक” “काही कळलच नाही” या व अशा अनेक कवितांचे वाचन करून या महान साहित्यिकांना अभिवादन केले.या कार्यक्रमास सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी कवी महानोर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.