(किशोर पवार/कळझोंडी)
रत्नागिरी तालुक्यातील जि. प. आदर्श प्राथमिक शाळा कळझोंडी नं १ बौद्धवाडी या शाळेच्या पटांगणात समोर नव्याने बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचा भव्य असा उद्घाटन सभारंभ प्रमुख अतिथी पंचायत समिती सभापती सौ. संजना माने, उपसभापती श्री उत्तम सावंत यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण व श्रीफळ वाढवून करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या माजी सभापती जि. प. सदस्या ऋतुजा जाधव, पंचायत समिती सदस्य गजानन तथा आबा पाटील, रत्नागिरी तालुका गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, शिक्षण अधिकारी सुनिल पाटील, पंचायत समिती सदस्या मेघना पाष्टे, शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, केंद्रप्रमुख स्मिता मांजरेकर, सरपंच दीप्ती वीर, उपसरपंच प्रकाश पवार, उद्योजक श्रीराम तथा आनंदा मुळ्ये, उद्योजक चित्तरंजन मुळ्ये, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय शितप, मुख्याध्यापक राजकुमार जाधव, सहाय्यक शिक्षिका चित्रा ठाकूर, शिक्षणप्रेमी नागरिक महादेव आग्रे, प्रकाश पवार, संदीप पवार, केशव शितप, संदीप बेनेरे, सूर्यकांत बंडबे, सहादेव वीर, अंजनी शिंदे वेदिका निंबरे, उदय अगोंडे, ग्रामसेवक अमोल केदारी, ग्रामस्थ, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून, दीप प्रज्वलन करून करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजकुमार जाधव यांनी केले. यावेळी त्यांनी शालेय शैक्षणिक उठावांतर्गत केलेल्या कामांचा आढावा घेत प्रलंबित असलेल्या कामांची ही माहिती देऊन विविध मागण्यांबाबत निवेदन केले. मान्यवरांच्या मार्गदर्शनपर मनोगतामध्ये प्रमुख अतिथी गजानन पाटील, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, जि.प. सदस्या ऋतुजा जाधव, उपसभापती उत्तम सावंत, सभापती संजना माने यांनी शाळेच्या सोयी-सुविधा मध्ये व भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. येथील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर पवार यांनी तर आभार प्रकाश पवार यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी मुख्याध्यापक राजकुमार जाधव, संदीप शेठ पवार, पांडुरंग सनगरे, महादेव आग्रे ,पांडुरंग शीतप, उपसरपंच प्रकाश पवार, यशवंत निंबरे, विनायक शिंदे, सर्व ग्रामस्थ पालक यांनी विशेष मेहनत घेतली.
संरक्षक भिंती उभारण्यासाठी पंचायत समिती सदस्य गजानन पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. रत्नागिरी तालुक्यातील जि. प. आदर्श प्राथमिक शाळा कळझोंडी नं १ बौद्धवाडी या शाळेच्या पटांगणात समोर नव्याने बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतीचा भव्य असा उद्घाटन सभारंभ प्रमुख अतिथी पंचायत समिती सभापती सौ. संजनाताई माने, उपसभापती श्री उत्तम सावंत यांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण व श्रीफळ वाढवून करण्यात आले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीमध्ये जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या माजी सभापती जि. प. सदस्या ऋतुजा जाधव, पंचायत समिती सदस्य गजानन तथा आबा पाटील, रत्नागिरी तालुका गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, शिक्षण अधिकारी सुनील पाटील, पंचायत समिती सदस्या मेघना पाष्टे, शिक्षण विस्तार अधिकारी सविता तोटावार, केंद्रप्रमुख स्मिता मांजरेकर, सरपंच दीप्ती वीर, उपसरपंच प्रकाश पवार, उद्योजक श्रीराम तथा आनंदा मुळ्ये, उद्योजक चित्तरंजन मुळ्ये, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय शितप, मुख्याध्यापक राजकुमार जाधव, सहाय्यक शिक्षिका चित्रा ठाकूर, शिक्षणप्रेमी नागरिक महादेव आग्रे, प्रकाश पवार, संदीप पवार, केशव शितप, संदीप बेनेरे, सूर्यकांत बंडबे, सहादेव वीर ,अंजनी शिंदे वेदिका निंबरे, उदय अगोंडे, ग्रामसेवक अमोल केदारी, ग्रामस्थ, नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय महामानवांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून, दीप प्रज्वलन करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजकुमार जाधव यांनी केले. यावेळी त्यांनी शालेय शैक्षणिक उठावांतर्गत केलेल्या कामांचा आढावा घेत प्रलंबित असलेल्या कामांची ही माहिती देऊन विविध मागण्यांबाबत निवेदन केले. मान्यवरांच्या मार्गदर्शनपर मनोगतामध्ये प्रमुख अतिथी गजानन पाटील, गटविकास अधिकारी तुकाराम जाधव, जि.प. सदस्या ऋतुजा जाधव, उपसभापती उत्तम सावंत, सभापती संजना माने यांनी शाळेच्या सोयी-सुविधा मध्ये व भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. येथील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर पवार यांनी तर आभार प्रकाश पवार यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वी पार पडण्यासाठी मुख्याध्यापक राजकुमार जाधव, संदीप शेठ पवार, पांडुरंग सनगरे, महादेव आग्रे, पांडुरंग शीतप, उपसरपंच प्रकाश पवार, यशवंत निंबरे, विनायक शिंदे, सर्व ग्रामस्थ पालक यांनी विशेष मेहनत घेतली. संरक्षक भिंती उभारण्यासाठी पंचायत समिती सदस्य गजानन पाटील यांनी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.