(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील मौजे कळझोंडी ग्रामपंचायतीच्या महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी सेवाभावी सामाजिक कार्यकर्ते संदीप लक्ष्मण पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
कळझोंडी ग्रामपंचायतीची महत्त्वपूर्ण ग्रामसभा सरपंच सौ. दीप्ती दीपक वीर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रा. प. कार्यालय कळझोंडी येथे पार पडली. या सभेत ही निवड करण्यात आली आहे. संदीप पवार यांना सामाजिक कार्याची आवड असून त्यांचे सर्वस्तरातील लोकांशी सलोख्याचे संबंध आहेत. अनेक गरजवंतांना त्यांनी सढळ हस्ते मदत केली आहे.
अध्यक्षपदाच्या निवडी प्रसंगी ग्रामविकास अधिकारी अमोल केदारी, ग्रा. प. ज्येष्ठ सदस्य व गायक सहदेव वीर, सदस्या सौ.रिना वीर, अंजली शिंदे, सूर्यकांत बंडबे, वेदिका निंबरे, सुविधा निंबरे, उदय आगोंडे यांसह गावातील ग्रामस्थ, महिला, तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी सहकार्य करावे, असे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप पवार यांनी केले. श्री. संदीप पवार यांचा सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला,क्रीडा अशा विविध क्षेत्रातील सक्रिय सहभाग असतो. संपूर्ण गावातून त्यांचे अभिनंदन होत आहे.