(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते साटलेवाडी येथे अहिल्याबाई होळकर यांच्या शिवधनातून उभारण्यात आलेल्या आणि ग्रामस्थांनी जीर्णोद्धार केलेल्या श्री रामेश्वर पंचायतन मंदिरात महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून भक्तगणांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन साटलेवाडी समाजसेवा मंडळ यांनी केले आहे.
रामेश्वर पंचायत मंदिरासमोरील मैदानात दिनांक १६ आणि १७ फेब्रुवारी २०२३ रोजी ‘रामेश्वर चषक’ भव्य कबड्डी स्पर्धा होणार आहेत. दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ७ ते १० महापूजा व आरती , १० ते ३ सामुदायिक अभिषेक, दुपारी १ ते २ महाप्रसाद, सायंकाळी ३ ते ६ हळदीकुंकू समारंभ, ६ ते ८ पालखी मिरवणूक, रात्रौ ९ वा. भजन , रात्रौ १० वा. श्री वरदान देवी नाट्य नमन मंडळ तुरळ हरेकरवाडी यांचे बहुरंगी नमन होणार आहे. या सर्व कार्यक्रमांना भाविकांनी उपस्थित रहावे असे आवाहन साटलेवाडी ग्रामस्थांनी केले आहे .