(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते साठलेवाडी येथे भाजलेल्या ६२ वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाला. रात्री उशिरा या घटनेची नोंद संगमेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, गोपिनाथ रामचंद्र आमकर असे मृताचे नाव आहे. आमकर हे १३ डिसेंबरला रात्री जेवण करून गोठ्यामध्ये झोपण्यास गेले होते. थंडी जास्त असल्याने त्यांनी ख्योटच्या शेजारी शेकोटी पेटवली होती, आमकर रात्री अचानक ओरडू लागल्याने घरातील मंडळींनी गोठ्याच्या दिशेने धाव घेतली. या वेळी गोपीनाथ आमकर शेकोटीमध्ये पडलेले दिसले. आमकर यांना तत्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
६५ टक्के भाजल्याने त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात नेत असताना दाभोळे येथे रुग्णवाहिकेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद रात्री उशिराने संगमेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.