(चिपळूण)
चिपळूण तालुक्यातील वहाळ गावचे प्रसिद्ध गणेश मूर्तिकार श्री शांताराम महादेव कदम यांच्या कारखान्याला ३६ वर्ष पूर्ण झाले असून ३७ वर्षात पदार्पण करणारी यशस्वी वाटचाल आहे. १फुटा पासून ५ फुटापर्यत शाडू माती पासून टिटवाळा लबागचाराजा बैल गाडा स्वर आशा विविध प्रकारच्या हस्त कौशल्यातून साकारलेल्या कलाकृती पहावयास मिळतात. शांताराम कदम यांचे गणपती केलेचे शिक्षण गिरगांव मधील मुगभाट येथील सुप्रसिद्ध कलावंत आदरणीय गुरुवर्य श्री मधुकर मेस्त्री त्यांच्याकडे वयाच्या १५ वर्षी झाले. त्यानंतर त्यांनी आपल्या वहाळ गावी १८ वर्षी कारखाना सुरू केला. त्यांच्याकडे गणपती काम शिकलेले काही शिष्य देखील आहेत. व त्यांचा स्वतःचा गणपती कारखाना आहे. यामधे महेश घडशी, अविनाश भागडे अनंत म्हापारले, संदीप जावळे यांचा प्रामुख्याने सहभाग असतो. गुरुवर्य श्री शांताराम महादेव कदम यांनी ही कला जोपासलेली आहे.
सध्या श्री गणेश कदम यांच्या कारखान्यांमध्ये ३५० विविध प्रकारचे मूर्ती बनवलेले आहेत. तोंडली पिलवली, वीर आबलोली शिरंबे मांडकी आणखी निवळी पालवन, सावर्डे व एक मूर्ती मुंबईला जाते. सध्या कदम यांना स्वप्निल व दीपेश गणपतीच्या कामात मदत करतात. तसेच कारखान्यात विविध मुले येऊन शिकत असतात. यंदा कुमार स्वप्निल कदम याने ३.५ फुटी गणपती हस्त कौशल्यातून गणेश मूर्ती बनवलेली आहे. आकर्षक रंगरंगोटी गणपती असल्यामुळे तालुक्यातून त्यांना चांगलीच मागणी आहे.