(ठाणे/उदय दणदणे)
कोकणात गाव-वाडी कुशीत पिढ्यानपिढ्या जोपासलेली सर्वाधिक लोकप्रिय असलेली लोककला अर्थातच “कलगी-तुरा” होय. कोकणातील अनेक लोककलावंत “कलगी-तुरा” ही लोककला आत्मसात करून आपल्या अंगीकृत असलेल्या कलेला विविधांगी नटवून समाजातील कष्टकरी व तणावाखाली जीवन जगणाऱ्या मराठी माणसाला कलगी-तुरा लोककलेच्या माध्यमातून जाखडी नृत्य सादरीकरणातुन समाज प्रबोधन करत जगण्याची नवी उमेद देत आहेत.
मनोरंजनाबरोबरच समाज प्रबोधनासाठी हा वसा हाती घेत “कलगी-तुरा” लोककलेची उन्नती व्हावी, शाहीरी लोककलावंताचा एक समाज तयार व्हावा या बहुरूपी उद्देशाने थोर गुरुवर्य (जनक) यांनी कलगी-तुरा समाज उन्नती मंडळ. (मातृसंस्था) या संस्थेची निर्मिती केली. या लोककलेला सन्मानपुर्वक बहुमान उंचावत पुढील पिढीने ही लोककला आत्मसात करून ही लोककला जिवंत ठेवण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे.
हा पूर्वजांचा वारसा अखंडितपणे चालत राहावा याच ध्येयाने संघटीत असणाऱ्या कलाकार शाहिरांची ही मातृसंस्था अशीच उन्नतीच्या मार्गावर सदैव प्रगतशील राहण्यासाठी कलगी तुरा समाज उन्नती मंडळ -मुबंई या मातृसंस्थेच्या व शाहिरी कलाकारांच्या उन्नतीसाठी प्रतिवर्षी एक कार्यक्रम मुंबई रंगमंचावर सर्व शाहिरांच्या उपस्थितीत राबविण्यात येतो. प्रतिवर्षी होत असलेल्या कार्यक्रमाला प्रामुख्याने संस्थेचे मुख्य सभासद अर्थात चिट्ठी मालक यांच्या सहाय्याने इच्छुक शाखेला व शाहिरांना कला सादरीकरण करण्यासाठी प्राधान्य दिले जाते.
प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून “मुळ कवी भानुदास घराणे” आणि “बाबू रंगले वासुवाणी घराणे” या घराण्यांना मान मिळाला असून शक्तीवाले “शाहिर-संदिप भुवड” शाखा-श्री भैरी वाघजाई हौशी कलापथक मु.परचुरी (फणसवाडी) ता.गुहागर आणि तुरेवाले “शाहिर -वैभव दिलीप नामे” शाखा – ओमसाई दत्तगुरू नाच मंडळ-तुळशी ता. खेड या दोन सुप्रसिद्ध शाहिरांमध्ये हा जुगलबंदीचा कार्यक्रम मास्टर दिनानाथ मंगेशकर नाट्यगृह विलेपार्ले -पूर्व मुबंई येथे बुधवार दिनांक-१० ऑगस्ट २०२२ रोजी रात्रौ ०८-३० वा.सादर होणार आहे.
याबाबतअधिक माहितीसाठी सुधाकर मास्कर-८८५००९९०९०, सत्यवान यादव ९२२१२००५०१, चंद्रकांत धोपट ७०३०८८१६९८ या संस्थेच्या पदाधिकारी यांच्याकडे संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे. सर्व सभासद , चिठीमालक, शाहिरवर्गसह शाखा, हितचिंतक, कलाक्षेत्रातील सर्व मंडळी व तमाम कोकण कलाप्रेमी रसिकांनी संस्थेच्या या उपक्रमाला सहकार्य करून सदर होणाऱ्या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कलगी-तुरा समाज उन्नती मंडळ -मुबंई कार्यकारणीच्यावतीने करण्यात आले आहे.