(नवी दिल्ली)
अमृत महोत्सवी प्रजासत्ताक दिन आज 26 जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. आज सकाळी दिल्लीतील कर्तव्यपथावर देशभरातील विविध राज्यातील सांस्कृतिक दर्शन घडविणाऱ्या चित्ररथांचे संचलन पार पडले. यामध्ये महाराष्ट्रातील चित्ररथ खास आकर्षक ठरला. कारण, महाराष्ट्राचा चित्ररथामध्ये शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आला. या चित्ररथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अन्याय आणि शोषण या विरोधातील संघर्ष दाखवण्यात आला आहे.
आज दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाचा सोहळा खास आकर्षक ठरला. यावेळी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानाची हजर होते. यावेळी विविध परेडसह साहसी प्रात्यक्षिके करण्यात आली. ध्वजवंदन आणि विवि त्याचबरोबर भारताची विविधेतून एकता दर्शवणारे राज्यांचे चित्ररथ देखील सहभागी झाल्याचे दिसून आले. यावर्षी कर्तव्यपथावर महाराष्ट्राचा आकर्षक असा चित्ररथ पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराजांना खास मानवंदना देणारा महाराष्ट्राचा चित्ररथ दिसून आला.
दिल्लीच्या कर्तव्यपथावर वेगवेगळ्या राज्याच्या संस्कृती आणि परंपरेचे दर्शन होत असते. विविधतेतून एकता जपणारे भारताचे हे जणू एक प्रतिबिंबच असते. हा सोहळा संपूर्ण देशाभरासाठी उत्साह निर्माण करणार असतो. सैन्याच्या विविध तुकड्यांचे संचलन तसेच परेड व प्रात्यक्षिके डोळे दिपवणारी असतात. यामध्ये एक मह्त्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे प्रत्येक राज्याचे वैशिष्ट्य मांडणारे खास चित्ररथ. हे चित्ररथ त्या त्या राज्याची परंपरा आणि इतिहास याचे दर्शन घडवत असते. या चित्ररथामुळे आपला भारत देशाची समृद्ध वारसा आणि परंपरा जगासमोर येते. या चित्ररथाच्या पंरपरेमध्ये आपला महाराष्ट्र देखील आपली वेगळी ओळख जपत आणि वाढवत असतो. यावर्षी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रजासत्ताक दिनाच्या या खास चित्ररथातून मानवंदना देण्यात आली.
प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत पार पडलेल्या चित्ररथ संचलनात सहभागी झालेला महाराष्ट्राचा चित्ररथ यावर्षी शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बनविण्यात आला. या चित्ररथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अन्याय आणि शोषण या विरोधातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. या चित्ररथा मॉंसाहेब जिजाऊ आणि बाल शिवबांची वेशभूषा परिधान केलेल्या कलवंतानी उपस्थितांची मने जिंकली.
“लोकशाहीचे प्रेरणास्थान : छत्रपती शिवाजी महाराज चित्ररथ”
महाराष्ट्राच्या चित्ररथामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्याची दिमाखदार दृश्ये दाखवण्यात आली. यामध्ये पुढे राजमाता जिजाऊ व बालशिवराय यांची प्रतिकृती साकारण्यात आली होती. जिजाऊ शिवरायांना स्वराज्याची शिकवण देत असल्याचे या मोठ्या प्रतिकृतीमध्ये दिसून येत आहे. त्याचबरोबर मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारुढ प्रतिकृती दाखवण्यात आली. याचबरोबर चित्ररथामध्ये शिवरायांसमोर मोठा तराजू देखील दाखवण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त महाराष्ट्र हा खास चित्ररथ सादर करण्यात आला.
“लोकशाहीचे प्रेरणास्थान: छत्रपती शिवाजी महाराज” या संकल्पनेवर अमृतमहोत्सवी प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राचा चित्ररथ दिसून आला. त्याचबरोबर भैरी भवानी परफॉर्मिंग आर्ट या कला पथकामधील 16 कलाकारांच्या ग्रुपने ढाल, तलवार, लाठी काठी यांसारखी प्रात्यक्षिके करुन दाखवली. यावेळी सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या (Tableau) देखाव्यावरील संपूर्ण शिल्प यवतमाळ जिल्ह्यात तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची कलाकृती दिल्लीच्या कर्तव्यपथावर झळकली.