(संगमेश्वर / प्रतिनिधी )
युवा पिढीने दहावी किंवा बारावी उत्तीर्ण झाल्यावर योग्य दिशा ठरवण्यासाठी तळ्यात किंवा मळ्यात अशी द्विधा अवस्था न ठेवता आपली स्वतःची असणारी आवड, आवडत्या क्षेत्रातील कल, त्यासाठी आपली भविष्यातील गुणवत्ता पूर्ण कामगिरी, योग्य आर्थिक स्थैर्य, व त्यातून मिळणारे मानसिक समाधान, यासाठी कारकीर्द, ओळख, कुवत सिद्ध करण्यासाठी सातत्यपूर्ण एकनिष्ठेने, एकाग्रतेने व्यवसायात, शिक्षणात, उद्योगात, खेळात इत्यादी क्षेत्रात कष्टाने यशस्वी व परिपूर्ण जीवन जगणे म्हणजेच आपले स्वतःचे करिअर होय. अशा अभ्यासपूर्ण अनुभवातून उत्तम प्रकारचे सखोल मार्गदर्शन संगमेश्वर पोलीस स्टेशनचे नवनिर्वाचित पोलीस निरीक्षक सुरेश गावित यांनी ग्रामपंचायत धामापूर तर्फे संगमेश्वर व राधा गोविंद फाउंडेशन सावर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करियर मार्गदर्शन शिबिरात केले. आपल्या नोकरीतील विविध अनुभव, सायबर गुन्हे, सामाजिक शांतता, मोबाईल द्वारे होणारी फसवणूक, व दाखवलेली आमिषे इत्यादी गोष्टी उपस्थित तरुण युवा पिढीला पटवून दिल्या.
त्यानंतर सह्याद्री शिक्षण संस्थेतील पॉलिटेक्निकचे प्राचार्य भोसले सर यांनी संस्थेमध्ये उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या दृष्टीने शिक्षणाच्या सोयी सवलती पटवून दिल्या. व ज्याला आपल्या आवडीप्रमाणे या संस्थेत विविध क्षेत्रात क्षेत्रांचे कोर्सेस, डिप्लोमा, डिग्री उपलब्ध असल्याचे मार्गदर्शनात कथन केले. त्यांच्या समवेत उपस्थित असलेले सावर्डा सह्याद्री शिक्षण आयटीआयचे प्राचार्य लकेश्री सर यांनीही डिझायनिंग, फिटर वेल्डर ड्राफ्ट्समन, डी टी एड, डीएड बीएड एग्रीकल्चर, हॉटेल मॅनेजमेंट, बिझनेस मॅनेजमेंट, इत्यादी विविध क्षेत्रांची माहिती देऊन ज्या विद्यार्थ्यांना आवड असेल त्यांनी संधीचा फायदा घेऊन आपले स्वतःचे जीवन किंवा करियर घडवून आपल्या आयुष्यात यशस्वीरित्या सुख समृद्ध व्हा. त्यासाठी आशा, आकांक्षा, जिद्द मनाशी परोपरिने बाळगा. त्यात कोणत्याही प्रकारचा खंड पडू देऊ नका. ज्या आई-वडिलांनी गरीबीतून तुम्हाला दिलेल्या शिक्षणाची जाण ठेवा. असे सखोल मार्गदर्शन करून उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. व अशा प्रकारचा भावी पिढीसाठी आयुत केलेल्या कार्यक्रमासाठी धामापूर ग्रामपंचायत व आयोजक यांना मनस्वी धन्यवाद दिले.
दहावी बारावी उत्तीर्ण मुलांना छत्री व इतर मुलांना वह्या यांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
त्याचबरोबर सूत्रसंचालन करत असताना श्री खातू गुरुजी यांनी करियर संदर्भात उत्कृष्ट अनुभव , कोणीही ना उभेत न होता शून्यातून कसे यशस्वी होता येते, याबद्दल अनेक उदाहरणांचे दाखले देऊन उपस्थितांची व मान्यवरांची मने जिंकली. शांताराम भायजे सरपंच धामापूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या शिबिराचे प्रस्ताविक श्रीयुत तुकाराम मेस्त्री यांनी केले. व्यासपीठावर उपसरपंच आशाताई बोले, उमेश महाडिक, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सुशील भायजे, दत्ताराम भायजे तंटामुक्ती अध्यक्ष श्रीयुत भीमराव गमरे, समाजसेवक प्रभाकर धनवडे, शंकर गमरे, सुभाष महाडिक आंबवचे सरपंच श्री.उकर्डे, श्रीयुत अनंत गुरव, अक्षय चव्हाण ,राकेश घाग सर, करजुवे हायस्कूलचे शिक्षक सुरज माने सर , सुबोध चव्हाण, पोलीस नाईक कामेरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.