(जाकादेवी/वार्ताहर)
रत्नागिरी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय लाजूळ करबुडे येथे जागतिक लोकसंख्या विस्फोट इशारा दिन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.महेंद्र कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
यावेळी विद्यालयातील कु. दुर्वा रामगडे, कुणाल ओरपे, कार्तिकी साळवी, आदि विद्यार्थ्यानी लोकसंख्या वाढ याविषयीं भाषणे केली. विद्यालायातील शिक्षक श्री अभिजीत जोशी यांनी लोकसंख्या वाढीची कारणे, दुष्परिणाम तसेच भारतासमोर असलेली आव्हाने याविषयीं मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात श्री. महेंद्र कुवकेकर यांनी लोकसंख्या नियंत्रण आणण्यासाठी समाज प्रबोधन करण्याचे आवाहन विद्यार्थ्याना केलें.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सुरेश पाटोळे यांनी तर आभारप्रदर्शन श्रीम. जयश्री जाधव यांनी केले. सदर कार्यक्रमासाठी सौ. प्रियांका चव्हाण, श्री. बाहुबली नाईक, श्री. गजमल बहिरम तसेच शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यालयातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.