(गणपतीपुळे/ वैभव पवार)
रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे १७ मे रोजी नवंगांव बौध्द दिक्षा भूमी विकास समिती करबुडे केळ्यें विभाग निर्मित दिक्षा भूमी क्रांती अशोक स्तंभाचे लोकार्पण श्रद्धेय मान. आनंदराज आंबेडकर यांच्या शुभहस्ते सकाळी ९.३० वाजता पार पडले. या मंगल प्रसंगी दिक्षा भूमी विकास समितीच्या वतीने मान. आनंदराज आंबेडकर यांना दिक्षा भूमी क्रांती स्तंभाची प्रतीकृती भेट देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच आनंदराज आंबेडकरांच्या हस्ते क्रांती स्तंभ बनवून देणारे आयु.राजकुमार ( राजस्थान ) अशोक धम्म चक्रांकीत मुद्रा धम्मदान देणा-या आयुष्यमती पुष्पलता गंगाराम जाधव, स्तंभाचे आरेखन तयार करणारे अविनाश जाधव आणि कलाकुसर तसेच श्रमदान करणाऱ्या कलाकारांनाही सन्मानित करण्यात आला. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत प्रत्येक्ष बौध्द दिक्षेचे पुण्यवान साक्षीदार असणा-यांचा यथोचित गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
या विचार मंचावरून समाजाच्या हितासाठी कामं करणा-या मान्यवरांचा गुणगौरव सत्यशोधक सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या धम्म बांधवांनी मुक्त हस्ताने धम्मदान देऊन संघटनेला आर्थिक सहकार्य केले. तसेच या कार्यक्रमाच्या मंडप ,स्टेजची संपूर्ण जबाबदारी रत्नागिरी जिल्हा (द) वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष मान रूपेंद्र जाधव यांनी उचलून या धम्म कार्यास मौलिक सहकार्य केले. नवंगावातील सर्व धम्म बंधू तसेच बावीस खेडे आणि मिलिंद प्रतिष्ठान आणि लाजुळ गावं इत्यादी ठिकाणांहून धम्म बांधव मिरवणूकीने येऊन तसेच कापडगांव, वळके, पोचरी इत्यादी गावातून आलेल्या धम्म बंधूंनी या दिक्षा भूमी क्रांती अशोक स्तंभाला भरभरून धम्मदान देऊन या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार झाले. तदनंतर सामुहिक भोजन आणि भीम , बुध्द गीतांच्या कार्यक्रमा नंतर या सोहळ्याची सांगता करण्यात आली.
नवंगांव आणि इतरही मीत्र गांव संघटना, तसेच विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांनी दिलेल्या सहकार्या बद्दल नवंगांव बौध्द दिक्षा भूमी विकास समिती करबुडे केळ्यें विभाग मुंबई संघटनेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.