(रत्नागिरी / प्रतिनिधी)
तालुक्यातील करबुडे येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अज्ञाताविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवार, दि. १८ मार्च रोजी सायंकाळी ६.४० ते सोमवार, २० मार्च २०२३ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या कालावधीत घडली आहे.
याबाबत शाखाधिकारी मनीषा नारायण रेगे (५३, रा. स्वयंवर मंगल कार्यालयसमोर माळनाका, रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, दि. १८ ते २० मार्च या कालावधीत अज्ञात चोरट्याने बँकेच्या कॅश केबीनच्या पुढ्यातील खिडकीच्या काचा फोडलेल्या आहेत. तसेच ग्रील पट्टी कापून व वाकवून आत शिरण्याचा प्रयत्न केलेला आहे. या प्रकरणी अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.