(संगमेश्वर)
तालुक्यातील तांबेडी गावचे सुपुत्र आणि सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद यांनी आपल्या सामाजिक कार्याच्या खर्चामधून विकास कामांचा धमाका सुरूच असुन करजूवे डावलवाडी आणि भाटलेवाडी येथे त्यांच्या माध्यमातून बोअरवेल मारण्यात आली आहे. तेथील ग्रामस्थांचा पाणी प्रश्न सिद्धेश ब्रीद यांनी तातडीने मार्गी लावला आहे.
करजुवे येथील डावलवाडी आणि भाटलेवाडी येथे मोठी पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली होती. ग्रामस्थांनी अनेक पुढाऱ्यांना वाडीतील लोकांना पाणी देण्यासाठी विनवणी केली. मात्र कोणीच पाण्याची व्यवस्था केली नाही. तेव्हा वाडीतील काही लोकांनी सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद यांना संपर्क केला आणि आपली समस्या मांडली. यावेळी सामाजिक कार्याचा वसा घेतलेला असल्याने ब्रीद यांनी ग्रामस्थांना शब्द दिला. फक्त तेवढ्यावरच न थांबता तात्काळ ग्रामस्थांची मागणी पूर्ण करत त्यांचा पाण्याच्या प्रश्न मार्गीही लावला. सिद्धेश ब्रीद यांनी केलेल्या कार्याबद्दल आपल्याला देवदूत मिळाल्याचे गौरव उदगार ग्रामस्थांनी काढले. यापूर्वीही ब्रीद यांनी परिसरातील तसेच तालुक्यातील अनेक सामाजिक कामे केली आहेत.