(संगमेश्वर)
संगमेश्वर तालुक्यातील करंजारी ग्रुप विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीची विविध कार्यकारी पंचवार्षिक निवडणूक पार पडली. अध्यक्षपदी श्री हेमंत हेगिष्टे तर उपाध्यक्षपदी श्री. मारूती शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी श्री.पाटील यांच्या उपस्थितीत ही निवडणूक संपन्न झाली.
प्रा विक्रांत शिंदे, सुरेश शिंदे, मधुसुधन भुर्के यांनी या कार्यक्रमाप्रसंगी मनोगत व्यक्त करून निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य यांचे करंजरी- घाटिवले परिसरातील ग्रामस्थांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी कार्यक्रमाला उपस्थित संस्था सचिव श्री जंगम, संचालक प्रा. विक्रांत शिंदे, दिनकर भुजबळराव, सुरेश शिंदे , अनंत भुजबळराव, दिपक जाधव, मिना शेणवी, अफजल पावस्कर, रामदास शेणवी ग्रामस्थ विलास बेर्डे, संदीप झोरे, महेश शेणवी उपस्थित होते.