(मुंबई / किशोर गावडे)
खेलो इंडिया आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया तर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने १० ते २५ मार्च या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्या अंतर्गत वरिष्ठ महिला कबड्डी खेळाडूंसाठी १७ मार्च रोजी सायंकाळी ०४:०० वाजता प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला होता.
या स्पर्धेमुळे खूप दिवसांनी सर्वांना खेळायची आणि एकमेकांना भेटायची संधी मिळाल्यामुळे या सर्व सहभागी खेळाडूंनी स्पर्धेचा आनंद लुटला. सिमरत गायकवाड आणि भारतीय क्रीडा प्राधिकरण येथील कबड्डी खेळाडूंनी नेटके आयोजन केले होते. त्यांचे सर्व सहभागी खेळाडूंनी कौतुक केले. आंतरराष्ट्रीय खेळाडू ललिता भोसले, लता पांचाळ, संपूर्णा कदम यांचे या स्पर्धसाठी विशेष सहकार्य मिळाले.