(संगमेश्वर / प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील कडवई येथील तांबडवाडी मधील रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरणसाठी अनेक दिवस ग्रामस्थ पाठपुरावा करत होते. मात्र अनेक राजकारणी लोकांनी फक्त आश्वासन दिले, मात्र रस्ता मात्र तसाच राहिला होता.
गावातील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक सिद्धेश ब्रीद यांना संपर्क केला आणि या समस्या सांगितल्या. त्यावेळीस दोन दिवसात गावात येऊन काम बघून काम सूरू करतो असे आश्वासन त्यांनी दिले. लोकांना वाटलं की सिद्धेश ब्रीद सुद्धा असेच आश्वासन देऊन इतर राजकारणी लोकांसारखे फक्त आश्वासन देऊन आमची खिल्ली उडवतील. मात्र झाले उलटे, बरोबर 2 दिवसाने सिद्धेश ब्रीद गावात जाऊन लोकांना भेटले. वाडीतील रस्त्याची पाहणी केली आणि चार दिवसात रस्ता रुंदीकरण काम केले. यामुळे तांबडवाडीतील लोकांनी या रस्त्याच्या समस्येमुळे
मोकळा श्वास घेतला आहे.
तांबडवाडी हा रस्ता कडवई मुख्य रस्ता पासून सुमारे अडीज किलोमीटरचा आहे. या रस्त्याची अवस्था बिकट असुन लोकांना त्रासदायक आहे. लवकरच रस्त्याचे काम सूरू होऊन रस्त्याचे डांबरीकरण पूर्ण करुन देणार असल्याचे सिद्धेश ब्रीद यांनी ग्रामस्थांना शब्द दिला आहे. रविवारी स्वतः जातीनिशी हजर राहून सूरू असलेल्या कामाची पाहणी करुन याबाबत ग्रामस्थांशी चर्चा केली. यावेळी तांबडवाडीतील ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद यांचे मनापासून आभार मानले आहेत.