( संगमेश्वर / प्रतिनिधी )
लहानपणापासून कष्टाचा, माणुसकीचा, उत्तम संस्काराचा, दातृत्वाचा जणू वसा घेतलेल्या, पंचक्रोशीतील प्रत्येकाला मायेने आपलेसे केलेल्या, सदोदित सर्वांच्या आठवणीत राहतील अशा, कडवईच्या माय संबोधल्या जाणाऱ्या विमल नामदेव खातू यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने व व अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. या विमल मायने या कुटुंबावर केलेले संस्कार, व या संस्कारातून आपले कुटुंब” हसरे खेळते”सुखी समाधानी कुटुंब, पूर्णपणे एकत्र कुटुंब ख्याती म्हणून निर्माण केले व ते आजही अविरतपणे चालू आहे. वेळेला गावात उपयोगी पडणारी व सरळ हस्ते प्रसंगी मदत करणारी व्यक्ती आपल्यातून गेल्याने उपस्थितांचे अश्रू अनावर झाले.
आर्थिक परिस्थिती गरीबीचीच असताना माऊलीने शिवणकाम, तसेच कष्टाची कामे करून आपल्या संसाराचा गाडा उत्कृष्ट यशस्वी रेटला. कडवईतील बटाटे वडा जणू यांनीच लॉन्च केला. अपरंपार कष्ट, व्यवहारात पारदर्शकता, सचोटी गुण, अपरंपार माणुसकी यामुळेच या दशक्रोशीत लोकप्रिय झाल्या.“दिल्याने कमी होते असे नाही, तर वृद्धी होते”यावर त्यांचा मोठा विश्वास! त्या स्वतः उत्तम सुगरण होत्या. त्यांचा हा वारसा त्यांनी आपल्या सुनांना सुद्धा शिकवलाय.
कडवईतील दत्तकृपा मंगल कार्यालयाचे मालक, व उद्योजक दिलीप उर्फ बापू खातू यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, जावई, सुना, नातू पणतु असा गोकुळा समान मोठा परिवार आहे.