रत्नागिरी : सागरी सुरक्षाच्यासाठी तैनात असलेल्या भारतीय नौसेना, कोस्ट गार्ड, कस्टम्स, पोलीस व मत्स्य विभागाच्या गस्ती नौकांनसह संस्थेच्या नौकांना संस्थेच्या सध्याच्या रत्नागिरी येथील मिरकरवाङा बंदरातील कंझ्युमर डिझल पंपावरून पेट्रोल वितरण करण्यास शासनाकडून मान्यता मिळाली असून त्याचे उद्घाटन खा. श्री. विनायक राऊत यांच्या हस्ते रविवार दिनांक २२ ऑगस्ट २०२१ रोजी शिव सहकार सेनेच्या अध्यक्ष श्रीमती शिल्पा सरपोतदार व किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
श्री. राऊत यांनी मच्छिमारी विषयी अनेक समस्यांवर शासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची माहिती दिली तसेच केंद्र व राज्य शासनाकडून मत्स्य उद्योगाला प्रोत्साहन देण्याकरता विविध उपक्रमाबद्दल मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष श्री. सुधाकर मोंडकर, उपाध्यक्ष श्री. दिलावर गोदड, सर्व सभासद व कर्मचाऱ्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांचे आभिनंदन केले. तसेच श्री. संदीप तांबे यांनी आजवर मच्छिमारांच्या हितासाठी केलेल्या विविध कामाबद्दल प्रशंसा केली व भगवती मच्छिमार संस्थेला पेट्रोल वितरण करण्यास शासनाकडून मान्यता मिळऊन देण्यात त्यांच्या प्रयत्नाला आज यश आले असे सांगत त्यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार व गवरव केला.
शिव सहकार सेनेच्या अध्यक्ष शिल्पाताई सरपोतदार व रत्नागिरी जिल्ह्याचे मत्स्य व्यवसाय सहाय्यक आयुक्त श्री. नागनाथ भादूले यांनीही उपस्थितीतांना मार्गदर्शन केले व संस्थेच्या सर्व सभासदांचे आभिनंदन करत पुढील प्रगतिशील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, संपर्कप्रमुख श्री. सुधीरजी मोरे, श्री. राजेंद्र महाडिक, श्री. राहूल पंडित, सहकार सेनेचे जिल्हासंघटक श्री. गजानन पाटील, लोकसभा संघटक श्री. विलास पोतेरे, कार्यकारणी सदस्य श्रीमती वनिता देशमुख, लोकसभा संघटक श्री. संदिप माढे सर, नगरसेविका गोधडताई व अनेक मान्यवर – पदाधिकाऱ्यांसह मच्छिमार बांधवही मोठ्या संख्येत उपस्थितीत होते.