वास्तुशास्त्राच्या मते, रोपं आणि झाडे देखील घराच्या सुख-समृद्धीशी संबंधित असतात. जर झाडे योग्य दिशेने लावली गेली तर ते कुटुंबात समृद्धी आणतात, जर त्यांची दिशा चुकीची असेल तर ते बर्याच अडचणींना कारणीभूत ठरतात. वास्तुमध्ये अंगणात किंवा घराभोवती काही रोपे लावण्यास मनाई करण्यात आली आहे. अनेक लोकांच्या घरासमोर किंवा अंगणात चिंचेचे झाड असते. वास्तुशास्त्राच्या अनुसार चिंचेच झाड अतिशय अशुभ मानण्यात आलेले आहे. वास्तुशास्त्र मान्यतेनुसार अनेक वाईट शक्ती त्या झाडावर वास करत असतात. आणि त्याचा त्रास हा आसपास असणाऱ्या घरांना होतो. जे लोक ह्या चिंचेच्या झाडाजवळ राहतात, ज्यांचे घर चिंचेच्या आडाजवळ असते त्यांची कधीही प्रगती होत नाही असे मानले जाते.
त्या घरातील लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ लागतो. या लोकांची तब्येत दिवसेंदिवस खराब होऊ लागते. आणि अनेक प्रकारच्या रोगांनी आणि आजारांनी, त्या घरातील लोक ग्रासलेले होतात. मुलाबाळांच्या लग्नात, विवाह जुळताना अनेक अडचणी येतात. घरातील जे कोणी कर्ता पुरुष किंवा घरातील कर्ती महिला असेल तिच्या आणि अन्य लोकांच्या उद्योग आणि व्यवसायात सातत्याने अडथळे येतात परिणामी उद्योग व्यवसाय असेल तर बंद पाडतात.
घरातील वातावरण हे नेहमी अशांत, तसेच घरात नेहमी भांडणे, वादविवाद सतत होत राहतात. घरातील लोक एकेमकांशी अगदी विनाकारण, कोणत्याही कारणाने भांडू लागतात. हे झाड तुमच्या अंगणात असो किंवा नसो, ते तुमच्या घराच्या आसपास जरी असेल तरी सुद्धा त्याचा नाकारात्मक परिणाम नक्की पडतो.
हे झाड जर रस्त्याच्या दोन्ही बाजूला किंवा शेताच्या बांधावर अश्या ठिकाणी हे झाड असेल तर ते मात्र काढू नये. अश्या ठिकाणी झाड असणे हे चांगले असते, ह्यामुळे वास्तुशास्त्राच्या मते तुम्हाला चांगली फळे मिळतात. पर्यावरणाच्या दृष्टीने हे झाड खूप मोठी भूमिका पार पाडते.
घरातील तुळशीचे रोप ‘वास्तू’साठी लाभदायी असते. तुळशीच्या रोपाची लागवड घराच्या फक्त उत्तर, उत्तर-पूर्व किंवा पूर्वेकडील दिशेत करावी. तुळशीचे रोप घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. पण या रोपाची दिशा मात्र योग्य निवडा. घरात एकतरी ‘मनी प्लांट’ असावा! – घरात मनी प्लांट लावणे देखील खूप शुभ मानले जाते. ही वनस्पती घराच्या उत्तर किंवा दक्षिण-पूर्व दिशेने लावली पाहिजे. मनी प्लांटद्वारे देवी लक्ष्मीची अपार कृपा, आपल्या घरावर आणि कुटुंबावर राहते, असे मानले जाते.
घरात काटेरी झाडे लावू नये. आपण आपल्या घरात काटेरी झाड लावणे कटाक्षाने टाळावे. घराच्या दक्षिणेकडील पाकड आणि काटेरी झाडांमुळे अनेक आजार उद्भवतात. घरात ‘कॅक्टस’ लावल्याने आर्थिक समस्या उद्भवतात, असे म्हटले जाते. गुलाबाच्या झाडाव्यतिरिक्त इतर काटेरी झाडे घरात नकारात्मक उर्जा निर्माण करतात.
झाडांमध्ये देवदेवता असतात आणि ही झाडे आपल्याला यश मिळून देतात, आपल्याला पॉसिटीव्ह बनवतात. आपल्या घरासाठी खालील झाडे सकारात्मक उर्जा निर्माण करतात.
१) तुळस :- तुळस हि खूप पवित्र मानली जाते. आपल्या घरात तुळशीचं झाड हे असलच पाहजे . तसेच तुळशीची पूजा हि दररोज केली पाहिजे, तुळस हि पूर्व किंवा उत्तर दिशेला असलयास अधिक चांगलं असत. तसेच संद्याकाळी तुळशीजवळ दिवा आणि उदबत्ती हि लावली पाहिजे. तुळस हि विष्णुप्रिय म्हणून ओळखली जाते. त्यामुळे तुळशी आणि भगवान विष्णू हि आपल्यावर प्रसन्न होते आणि लक्ष्मी माता हि आपल्यावर प्रसन्न होते
२) मणी प्लॅन्ट :- मनी प्लॅन्ट हे आपल्या घरात असणे खूप शुभ मानले जाते. प्रत्येकानी मणी प्लॅन्ट हे आपल्या घरात लावले पाहिजे. पण मनी प्लॅन्ट हे आपल्या मैत्री कडून तसेच शेजाऱ्यांकडून आणावे, पण हे झाड विकत आणू नये. मनीप्लँट हे झाड नेहमी हिरवे गर असावे , हे झाड जसे बहरलं असं आपली प्रगती होत असते. हे झाड कधी वळून देऊ नये त्याची काळजी हि योग्यरीत्या घ्यावी .
३) बांबूचं झाड :- बांबूचं झाड हे घरात असल्यामुळे वास्तुदोष दूर होण्यास मदत होते. बांबू च झाड हे खूप पॉसिटीव्ह असते. बांबूचं झाड हे घरात लावल्याने घराची प्रगती होते. बांबूचं झाड हे खूप शुभ असते. बांबूचं झाड हे आपल्या घरात लावल्याने आपलय घरातल्या सदस्याचे आरोग्य सुधारते. बांबूचे झाड घरात असल्याने लक्ष्मी हि आपल्या घरात वास करते . त्यामुळे तुमच्या घरात बांबू चे झाड हे लावल्यास तुम्हाला खूप फायदा होईल. तसेच बांबूचे झाड हे पूर्व दिशेला असावे.
४) गोकर्णाचे झाड :- गोकर्णाचे झाड घरात लावल्याने लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो. गोकर्णाच्या झाडामुळे आपल्या घरात पॉसिटीव्हिटी वाढते. गोकर्णाच्या वेलीला विषुप्रिय असे म्हणतात. निळ्या गोकर्णाचे फील हे शनिदेवांना प्रिय असते. गोकर्णाचे झाड हे ईशान्य दिशेला लावलेली असावी. गोकर्णाच्या झाडामुळे आपल्या घराची प्रगती होते. तसेच आपल्याला पैश्याची कमतरता भासत नाही.
५) स्नेक प्लांट :- स्नेक प्लॅन्ट हा वास्तूसाठी खूप शुभ आहे. स्नेक प्लॅन्ट घरात लावल्याने आपले आजारपण दूर होण्यास मदत होते. स्नेक प्लॅन्ट घरात लावल्याने आपला ट्रेस कमी होण्यास मदत होते. स्नेक प्लॅन्ट हे खूप सुंदर दिसतं. स्नेक प्लॅन्ट हि हवा शुद्ध करण्याचं काम करते.तसेच रात्री आपल्या घरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढवते. स्नेक प्लॅन्ट हे आपल्या घरात धन लाभ होते, तसेच लक्ष्मी सदैव आपल्या घरात वास करते.
(टीप: वर दिलेली सर्व माहिती धार्मिक श्रद्धा व सामजिक मान्यतेच्या आधारावर दिली गेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा उद्देश नाही)